Case Registered : श्रीगोंदा : गावरान गाय खरेदी करून गावी घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला (Farmer) व पिकअप चालकाला रस्त्यात अडवून त्यांची लूट करून बेदम मारहाण (Severe beating) करत, अमानुष व संतापजनक अत्याचार केल्याची घटना टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर घडली आहे. पीडितांचे कपडे काढून बाटलीत लघवी करून ती जबरदस्तीने पाजण्याचा आणि त्याचा व्हिडिओ काढण्याचा विकृत प्रकार घडल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात प्रतिक पाचपुते याच्यासह १० ते १५ जणां गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना योग्य वेळेत पाणी मिळण्यासाठी आवर्तनाचे वेळापत्रक तयार करावे : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
गजाने मारहाण
या बाबत दिलेल्या फिर्यादी नुसार गुणवडी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकरी विजय भाऊसाहेब शेळके यांनी टाकळी लोणार येथून गावरान गाय व तिचे कालवड १४ हजार रुपयांना खरेदी केले होते. ही गाय महेश संदीप जाधव यांच्या पिकअप वाहनातून घरी घेऊन जात असताना, दुपारी १:३० वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली. त्यांनी लाकडी काठी आणि गजाने मारहाण करत गाय व रोख रकमेची मागणी केली. शेतकऱ्याने विरोध करताच आरोपींनी फोन करून आपल्या इतर साथीदारांना पाचारण केले. काही वेळातच विनानंबरच्या काळ्या रंगाच्या कारमधून व इतर दुचाकींवरून १० ते १५ जणांचे टोळके घटनास्थळी आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाशवी कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट (Case Registered)
कारमधून उतरलेल्या प्रतिक पाचपुते व त्याच्या साथीदारांनी शेतकरी विजय शेळके आणि ड्रायव्हर महेश जाधव यांना लोखंडी टामी व काठ्यांनी अमानुष मारहाण केली. संशयित आरोपी प्रतिक पाचपुते याने ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने शेळके यांच्या खिशातील २१ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांनी दोघांचे कपडे काढून पाण्याच्या बाटलीत लघवी केली व ती जबरदस्तीने त्यांना पाजली. या सर्व पाशवी कृत्याचा आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओसुद्धा शूट केला.
कठोर कारवाई करण्याची मागणी
घटनेनंतर जखमींना तातडीने श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित शेतकरी विजय शेळके यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात प्रतिक पाचपुते, मोटरसायकलवरील २ अज्ञात इसम आणि इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर करत असून, अशा विकृत आणि गुंड प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे



