Kotwali Police Station : नगर-कल्याण हायवेवर गोवंश तस्करीचा डाव फसला; कोतवाली पोलिसांकडून १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

Kotwali Police Station : नगर-कल्याण हायवेवर गोवंश तस्करीचा डाव फसला; कोतवाली पोलिसांकडून १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला

0

Kotwali Police Station : नगर : नगर-कल्याण हायवे लगतच्या लिंक रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक (Illegal transport of cattle) करणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) जेरबंद केले आहे. या कारवाईत (Action Taken) पोलिसांनी १२ लाख रुपयांची वाहन आणि १ लाख रुपये किमतीची ५ गुरे असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव

कोतवाली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार वैभव काळे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अशोक शिंदे (वय 30), सागर बाळासाहेब दळवी (रा. शरणगाव) आणि गणेश बेरड (पत्ता माहीत नाही), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निर्दयतेने बांधून कत्तलीसाठी घेऊन जात होते (Kotwali Police Station)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. ६ सप्टेंबर रोजी रात्री 11.55 वाजता नगर-कल्याण हायवे लिंक रोडवर आतमध्ये 100 मीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी अक्षय अशोक शिंदे (वय 30), सागर बाळासाहेब दळवी (रा. शरणगाव) आणि गणेश बेरड (पत्ता माहीत नाही) हे त्यांच्या ताब्यातील गाडीमध्ये २ बैल आणि ३ गायी अशा ५ जनावरांना निर्दयतेने बांधून कत्तलीसाठी घेऊन जात होते. यामध्ये पांढऱ्या रंगाचा बैल (वय ५ वर्षे), काळ्या रंगाचा बैल (वय ६ वर्षे), दोन गावरान व जर्सी गायी आणि एक जर्सी गाय यांचा समावेश आहे.

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून वाहनावरील जनावरे ताब्यात घेतली असून जनावरांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार शरद साख हे करीत आहेत.