Gautami Patil Dance : गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सचा मुद्दा तापला;पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
Gautami Patil Dance : गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सचा मुद्दा तापला;पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil Dance) विरुद्ध ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्यात (Thane Naupda Police Station) तक्रार दाखल (Complaint filed) करण्यात आली आहे. राज्यामध्ये नुकताच दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राज्यात विविध मंचांवर गौतमी पाटीलसह इतरही नृत्यांगणाने केलेले सादरीकरण हे वादात सापडले आहे. नेटकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळाले. या सर्व प्रकाराला आता गंभीर वळण मिळाले आहे.

नक्की वाचा : अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस असा मरत असतो का? मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केली शंका

नगरसेविका पेंडसे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली तक्रार (Gautami Patil Dance)

गौतमी पाटील विरोधात ही तक्रार भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानी यासंदर्भातील एक व्हिडिओही पोलिसांकडे दिला आहे. अशा प्रकारच्या नृत्यामुळे सामाजिक जीवनात विकृती वाढत असल्याचा दावा करत मृणाल यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की, ही तक्रार कोणत्याही राजकीय विरोधातून करत नसून एक महिला म्हणून दाखल करत आहे. ठाणे पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी त्यांचं म्हणणं सविस्तरपणे मांडलं आहे.

अवश्य वाचा : ‘धर्मवीर गड’ आता राज्य संरक्षित स्मारक घोषित; राज्यसरकारचा निर्णय

‘कलाकारांना बोलवून अतिशय अश्लील प्रकारचे नृत्य केले जाते’ ( (Gautami Patil Dance)

नगरसेविका मृणाल पेंडसे म्हणाल्या की, “नुकत्याच झालेल्या दही हंडीच्या कार्यक्रमात बऱ्याच ठिकाणी कलाकारांना बोलवून जे काही नृत्य केले ते अतिशय अश्लील प्रकारचे नृत्य होते. त्याचा एक व्हिडिओ इथे मी जोडत आहे. एकीकडे आपण बघतो, की समाजात विकृती पसरत आहे. लहान लहान मुलींवरती अत्याचार होतात आणि हे सगळं आजूबाजूला घडत असताना अशा प्रकारचे नाच होत असतील किंवा अशा प्रकारच्या डायलॉगमुळे आपण या विकृतींना फोफावण्यासाठी आणखीन समर्थन देतोय, असे माझे मत आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, “अशा प्रकारच्या सार्वजनिक जागेवरून हे असं कृत्य करणाऱ्या या गौतमी पाटील हिच्यावरती आणि आयोजकांवर देखील गुन्हे दाखल व्हावेत, अशी माझी मागणी आहे, याबाबतची तक्रार राज्य महिला आयोगालाही दिली असल्याचं त्यांनी सांगितले आहे.