Shri Praveen Rishi Ji Maharaj : ‘खमाव खमाव’च्या गजरात आनंद तीर्थ समवशरण येथे‌ सामूहिक क्षमापना

Shri Praveen Rishi Ji Maharaj : 'खमाव खमाव'च्या गजरात आनंद तीर्थ समवशरण येथे‌ सामूहिक क्षमापना

0
Shri Praveen Rishi Ji Maharaj : 'खमाव खमाव'च्या गजरात आनंद तीर्थ समवशरण येथे‌ सामूहिक क्षमापना
Shri Praveen Rishi Ji Maharaj : 'खमाव खमाव'च्या गजरात आनंद तीर्थ समवशरण येथे‌ सामूहिक क्षमापना

प्रत्येकाच्या मनात कायम क्षमा भाव असावा : पूज्य प्रविणऋषीजी महाराज

Shri Praveen Rishi Ji Maharaj : नगर: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज (Anand Rishiji Maharaj) यांच्या पावन भूमीत आनंदधाम परिसरातील आनंद तीर्थ समवशरण येथे‌ बुधवारी पर्युषण पर्वातील सामूहिक क्षमापना कार्यक्रम पार पडला. जीवनात कळत नकळत चुका होतात. वागण्या बोलण्यातून कोणाचे मन दुखावले दुखावले जाते, अशा सर्व गोष्टींसाठी सर्वांनी हृदयपूर्वक क्षमा याचना केली. ‘खमाव खमाव’च्या गजरात सामूहिक क्षमापना कार्यक्रम झाला.

कार्यक्रमावेळी उपस्थिती

महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा.(Pravartak Shri Kundan Rishi Ji Maharaj), अर्हम् विज्जा प्रणेता
उपाध्याय प्रवर पूज्य प्रविणऋषीजी म.सा. (Shri Praveen Rishi Ji Maharaj), पूज्य आलोकऋषीजी म.सा., पूज्य तिर्थेशऋषीजी म.सा., पूज्य सत्यप्रभाजी म.सा., पूज्य अमितज्योतीजी म.सा. आदी साधू साध्वीजींच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमावेळी आ.संग्राम जगताप, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, जैन सोशल फेडरेशनचे डॉ.‌प्रकाश कांकरिया, समर्पण चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती व अहिल्यानगरचे सुपुत्र तथा तिरूपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ हेमराज बोरा, सौ. राखी सौरभ बोरा, प्रमिलाताई हेमराज बोरा, पराग बोरा व बोरा परिवारातील सदस्य, चातुर्मास भोजन कमिटीचे संतोष पिपाडा, समर्पण चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष अशोक (बाबूशेठ) बोरा, महामंत्री आदेश चंगेडिया, कार्याध्यक्ष राजेश भंडारी, कोषाध्यक्ष विलास कटारिया, उपाध्यक्ष अनिल पोखरणा, राजकुमार बोरा, विजय गुगळे, सुरेश कांकरिया, सचिन देसरडा, मनसुख गुंदेचा, सहसचिव अभय गांधी, अभिजीत गांधी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज म्हणाले,

पर्युषण पर्व मतभेद, कटुता समाप्त करण्याचे पर्व आहे. एक दुसऱ्याची क्षमा मागून भूतकाळातील चुका दुरुस्त करायच्या असतात. हे पर्व जैन समाजाचा गौरव आहे. उपाध्यायश्री जिन शासनाची प्रभावना करून प्रत्येकाला नवीन दृष्टी देत आहेत. यंदाच्या चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी सौरभ बोरा यांनाही ‘समाज रत्न’ म्हणून मी अलंकृत करत आहे.

पूज्य प्रविणऋषीजी महाराज मार्गदर्शन करताना म्हणाले,(Shri Praveen Rishi Ji Maharaj)

जेव्हा दुसऱ्यांकडून खूप अपेक्षा ठेवली जाते तेव्हा कुठे ना कुठे दुखावले जातोच जितक्या अपेक्षा कमी असतात तितके नाते कमजोर असते. अपेक्षा जास्त असतील तर नातेही अधिक घट्ट असते. या घट्ट नात्यातही कधी कधी एकमेकांना दुखावले जाते. त्यांच्याप्रती क्षमा भावच हवा. चातुर्मासात नगरच्या भाविकांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. चातुर्मासाला समर्पण नाव आम्ही दिले पण समर्पण काय असते हे नगरच्या भाविकांनी दाखवून दिले. अनेकांशी माझा थेट संपर्क नसूनही त्यांनी चातुर्मासात स्वतःला झोकून दिले आहे. या सर्वांच्या भावना मला कळतात पण ते कुठलीही तक्रार करत नाहीत. असे निरपेक्ष प्रेम केवळ गुरूदेवांच्या कृपेने गुरूदेवांच्या भूमीतच मिळू शकते, इतरत्र कुठेही हे शक्य नाही. अशावेळी कळते की गुरूदेवांनी आपल्या शिखर साधनेसाठी नगरची भूमी का निवडली.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, समर्पण चातुर्मासातील पर्युषण पर्वाची सांगता झाली आहे. पूज्य प्रविणऋषीजी महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांना लाभत आहे. सर्वांनी जप तप उपवास केले. त्यामुळे नवीन पिढीला अध्यात्माची, धार्मिकतेची गोडी लागते. संपूर्ण कुटुंब धार्मिक होते. या समर्पण चातुर्मासामुळे देशभरात अहिल्यानगरचा नावलौकिक होत आहे. आज क्षमा याचनेचा दिवस आहे. प्रत्येक व्यक्तीकडून जीवनात कळत नकळत चुका होत असतात. पर्युषण पर्व आपल्याला क्षमायाचना करून आपापसातील संबंध पुन्हा चांगले करण्याची संधी देते. ही मानवतेची विचारधारा जैन धर्मात आहे.

चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष अशोक (बाबूशेठ) बोरा म्हणाले, अहिल्यानगरमधील चातुर्मासाचे दोन महिने पूर्ण झाले आहेत. पूज्य गुरु भगवंतांचे अनमोल मार्गदर्शन सर्वांना मिळत आहे. चातुर्मास काळात नगरमधील सर्व संघांचे चांगले सहकार्य लाभत आहे. सौरभ बोरा मित्र परिवार, भोजन कमिटी सदस्य अतिशय चांगले काम करून सर्व व्यवस्था उत्तम राहील याची काळजी घेत आहे. चातुर्मासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानून क्षमायाचना करतो. सर्व ट्रस्ट मंडळ सदस्यही सर्व नियोजनात अतिशय मोलाचे योगदान देत आहेत. या काळात भाविकांची काही गैरसोय झाली असेल तर मी क्षमायाचना करतो.


समर्पण चातुर्मास कमिटीच्या सर्व ट्रस्टी मंडळाने ट्रस्ट तर्फे व वैयक्तिक परिवारातर्फे क्षमायाचना केली. शेवटी प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज, पूज्य प्रविणऋषीजी महाराज यांच्या मंगलपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.