Load Shedding : श्रीगोंदा : शहरालगत असलेल्या औटीवाडी येथे सुरू असलेले लोडशेडींग (Load Shedding) थांबवावे आणि शहराप्रमाणेच २४ तास वीजपुरवठा (Power Supply) मिळावा, या मुख्य मागणीसाठी औटीवाडी ग्रामस्थांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयावर (Shrigonda Tehsil Office) धडक मोर्चा काढला. पारंपरिक वाद्य आणि पेटत्या मशाली हातात घेऊन काढण्यात आलेल्या या आंदोलनाने श्रीगोंदा शहराचे लक्ष वेधून घेतले.
नक्की वाचा : खताळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या संगमनेरमधील शेतकऱ्यांच्या व्यथा; आर्थिक मदतीची मागणी
मशाली पेटवून रोष व्यक्त
औटीवाडी येथे वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे (लोडशेडींग) नागरिक, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. “शहरासारखीच लाईट औटीवाडीलाही मिळालीच पाहिजे,” अशा जोरदार घोषणा देत संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालय परिसर दुमदुमून टाकला. भारनियमनाच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी मशाली पेटवून आपला रोष व्यक्त केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे सादर (Load Shedding)
या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक अनिल औटी, दादा औटी आणि पांडू औटी यांनी केले. या मशाल मोर्चात औटीवाडीतील तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले असून, वीज वितरण कंपनीने तातडीने योग्य पावले न उचलल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



