Bank Holiday : देशभरातील सरकारी बँका रविवारी सुरू राहणार; केंद्र सरकारचा निर्णय

0
Bank Holiday : देशभरातील सरकारी बँका रविवारी सुरू राहणार; केंद्र सरकारचा निर्णय

नगर : देशात वेगवेगळ्या घटना घडत असताना बँक कर्मचारी (Bank Holiday) संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक (Nationwide strike) दिली आहे. त्यामुळे या संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची अडचण होऊ नये आणि त्यांना बँकिंग सेवांपासून दूर राहावे लागू नये, यासाठी रविवार (ता. २७) रोजी (Sunday Bank) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) सुरू ठेवण्याचे निर्देश वित्त मंत्रालयाने दिले आहेत.

नक्की वाचा : शहीद पतीचा वारसा,श्रीरामपूरमधील वाळू तस्करांवर कल्पना पवारांची सर्जिकल स्ट्राईक

बँकांचा तीन दिवसांचा राष्ट्रव्यापी संप (Bank Holiday)

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने २७ सप्टेंबर, रविवार हा दिवस सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी नियमित कामकाजाचा दिवस म्हणून घोषित केला आहे. मंगळवारी (ता.२२) डेप्युटी चीफ लेबर कमिश्नर यांच्या उपस्थितीत बँक युनियन आणि संबंधित पक्षांमध्ये सलोखा बैठक झाली. या बैठकीत मात्र कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यानंतर UFBU ने संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला. यामुळे सरकारने रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य वाचा : राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, १२ जागांसाठी निवडणूक, भाजपचे आठ खासदार होणार निवृत्त

वित्त मंत्रालयाने २३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, UFBU चा प्रस्तावित संप २६ आणि २७ सप्टेंबरच्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांनंतर होणार आहे. त्यामुळे रविवारची बँक सुट्टी कायम राहिल्यास ग्राहकांना सलग अनेक दिवस बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार नाही. २६ सप्टेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील, तर २७ सप्टेंबरला रविवारची सुट्टी आहे. त्यानंतर २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांचा संप होणार आहे. त्यामुळे बँकिंग कामकाजावर सलग पाच दिवस परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून कर्मचारी संपावर (Bank Holiday)

सर्वसामान्यांच्या बँकिंगशी संबंधित अत्यावश्यक गरजा दीर्घकाळ प्रभावित होऊ नयेत, यासाठी २७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील. सोमवारपासून सुरू होणाऱ्या प्रस्तावित संपापूर्वी ग्राहकांना आवश्यक बँकिंग व्यवहार पूर्ण करता यावेत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.