Pawan Naik : कृषी विद्यापिठ संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरूण राजाला साकडे

Pawan Naik : कृषी विद्यापिठ संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरूण राजाला साकडे

0
Pawan Naik : कृषी विद्यापिठ संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरूण राजाला साकडे
Pawan Naik : कृषी विद्यापिठ संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरूण राजाला साकडे

Pawan Naik : अहिल्यानगर : २४ सप्टेंबर येथिल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाने (Mahatma Phule Rahuri Agricultural University) नादब्रह्म संगीतालय, अहिल्यानगर प्रस्तुत व पवन श्रीकांत नाईक (Pawan Naik) (आंतरराष्ट्रीय शास्त्रीय, सुगम व सुफी गायक) निर्मित “गाणी तुमची आमची – सुफी दरबार” अशी बहारदार मराठी, हिंदी, पंजाबी, ऊर्दू व ब्रज भाषेतील प्रसिंद्ध गीतांची मैफल आयोजित केली होती. बळी राजासाठी वरूण देवता (झुले लाल) यांच्यावर आधारीत व भारतीय संस्कृतीतील (Indian Culture) विविध देवी देवतांना आवाहनात्मक सुख समृद्धीसाठी वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा या संगीत मैफलीत जाणीवपुर्वक समावेश करण्यात आला होता.

यांचा विशेष सहभाग

संगीत मैफलीत मुख्य गायक – पवन श्रीकांत नाईक, गायिका – सरोज पालडीया, कल्याण मुरकुटे व पंकज नाईक (संवादिनी), कुलदीप चव्हाण (बेंजो), स्मिता राणा (सतार), सालोमन पेहेलवान (व्हायोलिन), प्रणव देशपांडे (सिंथेसायझर), सुरज शिंदे (तबला), आदित्य मोरे (ड्रम), नेगीन काजे़मी (डफ) तेहरान – ईरान, सहगायक – निनाद पारखी, श्रेयस शीत्रे, पवन तळेकर, मूलांशु परदेशी, अथर्व कोरडे, ऋषी त्रिवेदी, आश्लेषा मोरे, जयंत पाठक व विजय जाधव. सूत्रसंचालन – दिप्ती शुक्रे व संकेत गांधी तसेच तंत्रज्ञांमध्ये ध्वनी व्यवस्था – रवी जाधव व प्रकाश योजना – सागर चव्हाण यांचा विशेष सहभाग होता.

Pawan Naik : कृषी विद्यापिठ संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरूण राजाला साकडे
Pawan Naik : कृषी विद्यापिठ संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरूण राजाला साकडे

पवन श्रीकांत नाईक यांनी मैफलिची सुरूवात गणेश वंदना – गणपती बाप्पा के दरबार याने केली, नंतर अनुक्रमे शिवस्तुती – खंडेरायाच्या लग्नाला, लोक साहित्यातील पठ्ठे बापूराव यांनी रचलेली कृष्ण भक्तिपर गवळण – दहिवाली मी गवळ्याची नार या रचना पुर्वार्धात सादर केल्या.

Pawan Naik : कृषी विद्यापिठ संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरूण राजाला साकडे
Pawan Naik : कृषी विद्यापिठ संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरूण राजाला साकडे

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बोल आलाप व तानांनी मैफलीत खास रंगत (Pawan Naik)

मैफलिच्या उत्तरार्धात सुफी रचनांचा सहभाग होता. सासों की माला, पग़ घुंगरू बांध मिरा नाची थी (सरगम), सेव्हण वाला पीर झुले लाल, किन्ना सोणा तैणू रबने बनाया, तेरे वाज्जो दिल दिया मेहरम, जूर्म सिर्फ ईतना है व मेरे रश्के क़मर या प्रसिद्ध रचना सादर केल्या. मूलांशु परदेशी याने “आली भवानी राउळात” हि देवी स्तुती व सरोज पालडीया यांच्या बोल आलाप व तानांनी मैफलीत खास रंगत भरली.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय गायक श्री पवन नाईक यांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले. याप्रसंगी उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, सहाय्यक कुलसचिव श्री व्ही. टी. पाटील, डॉ. अधीर आहेर,डॉ. भगवान देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here