
NCMC Card : विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना NCMC कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती MSRTCने अधिकृत पोस्ट मार्फत दिली.
१ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य
*एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे.
- NCMC कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे.
*एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे.
*या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. - *१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी त्यापूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
- *ज्या प्रवाशांकडे कार्यरत (Active) NCMC कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे.
- *विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना NCMC कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे.
- *ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे.
- *NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- *त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
- 🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
BHIM App द्वारे Top-up करण्याची सुविधा (NCMC Card)
*NCMC कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी BHIM App द्वारे Top-up करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
*कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करून Top-up करता येणार आहे.
*दरम्यान, आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे.
*सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने NCMC कार्ड प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असून, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी NCMC कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.


