Bus Conductor : राहुरी : पाचोरा डेपोची (Pachora Depot) एसटी बस पुणे येथून अहिल्यानगरमार्गे पाचोरा येथे जात असताना राहुरी येथे बस आली असता वाहकाची (Bus Conductor) प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना शुक्रवार, (ता. २५) सकाळी सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास घडली. किरण गंगाराम पाटील (वय ४५, रा. पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे मृत वाहकाचे नाव आहे.
नक्की वाचा : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित; संगमनेर तालुक्याचा समावेश
वैद्यकीय उपचारापुर्वीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा डेपोची एसटी बस पुणे येथून अहिल्यानगरमार्गे पाचोरा येथे जात होती. ही बस राहुरी बसस्थानकात आल्यानंतर काही प्रवासी उतरले, तर नवीन प्रवासी बसमध्ये चढले. मात्र, बसचे वाहक किरण पाटील हे बसबाहेर न आल्याने चालक उमेश पाटील यांनी बसमध्ये जाऊन त्यांची पाहणी केली.यावेळी किरण पाटील हे बसमध्ये झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. चालक उमेश पाटील यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर चालक उमेश पाटील, राहुरी बसस्थानकातील व्यवस्थापक तसेच नागरिकांच्या मदतीने किरण पाटील यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वैद्यकीय तपासणीनंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट (Bus Conductor)
चालक उमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पाटील यांना मागील दोन दिवसांपासून त्रास होत होता. मात्र, त्यांनी त्यासाठी उपचार घेतले नव्हते. त्यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण तीव्र हृदयविकाराचा झटका असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचाी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे करीत आहेत.



