Dr. Sujay Vikhe Patil : स्वीडन कुठ हे त्यांना माहिती नाही; डॉ. सुजय विखे यांचा लंकेंना टोला

जनतेने आम्हाला महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये स्थान दिलं

0
Dr. Sujay Vikhe Patil : स्वीडन कुठ हे त्यांना माहिती नाही; डॉ. सुजय विखे यांचा लंकेंना टोला
Dr. Sujay Vikhe Patil : स्वीडन कुठ हे त्यांना माहिती नाही; डॉ. सुजय विखे यांचा लंकेंना टोला

Dr. Sujay Vikhe Patil : नगर : विखे आणि लंके यांच्यात नीला विखे (Neela Vikhe) यांच्या खासदारकीच्या मुद्द्यावरुन चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. या मुद्द्यावरुन खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) म्हणाले की, खासदारांचे काही ठरलेले डायलॉग आहेत. त्यांना स्वीडन कुठे आहे, हेही माहिती नाही, त्यामुळे त्यांनी या विषयावर भाष्य करू नये.

नक्की वाचा : प्रकृती बिघडल्याने बस वाहकाचा मृत्यू; राहुरी येथील घटना

मागील दोन वर्षांत या जिल्ह्याच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आणता आला नाही. जिल्ह्यासाठी ठोस काम करता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या कौटुंबिक वादात किंवा कौटुंबिक संवादात पडून त्याचं राजकारण करणं, ही विचारसरणीच या जिल्ह्यासाठी धोकादायक आहे. राजकीय व्यक्तीचं राजकीय आणि व्यक्तिगत असं दोन वेगळं आयुष्य असतं. राजकीय आयुष्यात पक्ष असतात, पक्षाच्या भूमिका असतात आणि आरोप-प्रत्यारोपही होतात. मात्र, व्यक्तिगत आयुष्याची एक मर्यादा असते.

गेल्या काही वर्षांत खासदारांवर अनेक आरोप

गेल्या काही वर्षांत खासदारांवर अनेक आरोप झाले. महिलांशी संबंधित आरोप झाले, कॉल रेकॉर्डिंगही समोर आली. मात्र, मी कधीही त्या मुद्द्यांचा राजकीय फायदा घेऊन भाष्य केलेलं नाही. माझी एकही बाईट दाखवा, ज्यामध्ये मी खासदारांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा चारित्र्यावर भाष्य केलं आहे. कारण व्यक्तिगत आयुष्यात कोणाच्याही जाणं योग्य नाही, हा सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जपला आहे आणि तोच सुसंस्कृतपणा जपण्याचा मी प्रयत्न करतोय.मात्र, ज्यांना समाजाच्या आणि जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, ते दुसऱ्यांच्या कौटुंबिक विषयांना राजकीय मुद्दा बनवत असतील, तर त्यावर जनतेने नक्कीच विचार केला पाहिजे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सुजय विखे पाटील म्हणाले की (Dr. Sujay Vikhe Patil)

आमदार रोहित पवारांवर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, मला माहित नाही की माध्यमांमध्ये नेमकं काय बोलले आहेत. मात्र, माझी त्यांना नम्र विनंती आहे की, तुम्ही एका सुसंस्कृत परिवारातून आलेले लोकप्रतिनिधी आहात.कौटुंबिक विषय माध्यमांसमोर आणण्याचे काम ना पवार परिवाराने कधी केले, ना विखे पाटील परिवाराने केले. आमचा छोटा परिवार आहे. मात्र, त्यांच्या कौटुंबिक विषयांवर मी बोलायला लागलो, तर त्यावर किती मोठी चर्चा होऊ शकते, याचा विचार आपण करू शकतो. पण आम्ही सभ्यता आणि सुसंस्कृतपणा पाळतो आणि त्यांनीही तो पाळावा, अशी माझी अपेक्षा आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये स्थान दिलं

तुम्ही आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर टीका करा, सरकारच्या कामावर टीका करा; मात्र कौटुंबिक वादामध्ये पडू नका, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे.आणखी एक मुद्दा म्हणजे, ते म्हणत असतील की जनतेने याचा विचार केला पाहिजे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की, आम्ही आज पक्षांतर केलं असेल किंवा आमच्याबाबत काहीही राजकीय भूमिका असतील, तरी मागील पाच विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये स्थान दिलं आहे. त्यामुळे कोणाच्या बोलण्याने आम्ही मोठे किंवा लहान होणार नाही.

आमचं काम जनसामान्यांचं कल्याण करणं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही काम करत राहू.मात्र, महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपण्याची जबाबदारी केवळ माझी नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधीची ती जबाबदारी आहे. राजकीय टीका करताना कौटुंबिक टीका होऊ नये, हीच माझी अपेक्षा आहे. अन्यथा राजकारणामध्ये कोणतीही मर्यादा किंवा लक्ष्मणरेषा उरणार नाही आणि त्यातून अत्यंत गलिच्छ राजकारण निर्माण होईल. असं राजकारण महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सुसंस्कृत परंपरेला निश्चितच शोभणार नाही.