ADCC Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसाठी पहिल्या दिवशी 361 उमेदवारी अर्जांची विक्री; श्रीगोंद्यातून एक उमेदवारी अर्ज दाखल

निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन आणि यंत्रणा सुसज्ज

0
ADCC Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसाठी पहिल्या दिवशी 361 उमेदवारी अर्जांची विक्री; श्रीगोंद्यातून एक उमेदवारी अर्ज दाखल
ADCC Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसाठी पहिल्या दिवशी 361 उमेदवारी अर्जांची विक्री; श्रीगोंद्यातून एक उमेदवारी अर्ज दाखल

ADCC Bank : नगर : राज्यासह देशाच्या सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या एडीसीसी अर्थात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज (ता. २८) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज (Candidature Application) दाखल करण्याची मुदत आहे. अर्ज दाखल करण्याच्या पद्धतीच्या पहिल्या दिवशी एक मात्र उमेदवारी अर्ज दाखल झाला असून 361 इतके उमेदवार अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे (Mangesh Survase) यांनी दिली.

नक्की वाचा : विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचे आयोजन; २९ सप्टेंबरला मुख्यामंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

21 संचालक पदासाठीची निवडणूक

सहकार आणि आर्थिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांच्या मार्गदर्शन संचालना त निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सारसनगर परिसरातील चहुराणा बुद्रुक येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू आहे. आज (ता. २८) सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघ (श्रीगोंदे) करिता माजी आमदार राहुल कुंडलिकराव जगताप यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

उमेदवारी अर्जाची किंमत शंभर रुपये (ADCC Bank)

उमेदवारी अर्जाची किंमत शंभर रुपये असून मतदार यादीची किंमत हजार रुपये आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टेबल क्रमांक एक नामनिर्देशन पत्र विक्री व अनामत रक्कम स्वीकृतीसाठी आहे. तर टेबल क्रमांक दोन येथे अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नगर येथील प्राथमिक कृषी पतपुरवठा व विकास सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था प्रतिनिधी करिता नामनिर्देशन पत्र स्वीकृती होणार आहे. टेबल क्रमांक तीन वर नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी करिता नामनिर्देशन पत्र स्वीकृती केली जाणार आहे. टेबल क्रमांक चार संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर करिता नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन आणि यंत्रणा सुसज्ज

टेबल क्रमांक पाचवर शेती पूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघाची नामनिर्देशन पत्र स्वीकृती केली जाणार आहे. टेबल क्रमांक सहावर बिगर शेती संस्थांचा मतदारसंघ नामनिर्देशन पत्र स्वीकृती केली जाणार आहे. टेबल क्रमांक सात वर महिला प्रतिनिधी मतदारसंघ आणि विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील मतदार संघाचे नामंदिर्देशांक पत्र स्वीकारली जाणार आहेत. टेबल क्रमांक आठवर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघातील नामनिर्देशन पत्र स्वीकृत केले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन आणि यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.