Protest Movement : अहिल्यानगरमध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन

विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक हिन दर्जाची वागणूक

0
Protest Movement : अहिल्यानगरमध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन
Protest Movement : अहिल्यानगरमध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन

Protest Movement : नगर : चंद्रपूर जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल कुमार गायकवाड यांच्या वर्तनाच्या निषेधार्थ राज्य संघटनेने (State Organization) दिलेल्या आदेशानुसार लेखा कर्मचारी संघटनेने (Accounts Staff Association) काळ्या फिती लावून अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या (Ahilyanagar Zilla Parishad) प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. तसेच याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसाठी पहिल्या दिवशी 361 उमेदवारी अर्जांची विक्री; श्रीगोंद्यातून एक उमेदवारी अर्ज दाखल

राधेश्याम सपकाळे म्हणाले की

गायकवाड हे त्यांच्या अधिनीस्त असलेल्या विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक हिन दर्जाची वागणूक देतात.‌कर्मचाऱ्यांशी अर्वाच्च भाषेत बोलतात. त्यांच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे कर्मचारी धास्तावले असून त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. गायकवाड यांनी कार्यपद्धती न सुधारल्यास लोकशाही मार्गाने वेगळे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.‌संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राधेश्याम सपकाळे म्हणाले, लेखा विभागातील कर्मचारी जिल्हा परिषदेचा आर्थिक कणा असतात. अतिशय जबाबदारीचे काम ते प्रामाणिकपणे करत असतात.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लेखा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित (Protest Movement)

दुर्देवाने चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी गायकवाड हे मनमानी पद्धतीने कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. अचानक टेबल बदलले जातात. कर्मचाऱ्यांशी चुकीचे वर्तन केले जाते. संघटनेच्या राज्य स्तरीय सभेतही चंद्रपूर येथील या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, सचिव विलास घायतडक, खजिनदार सोनाली चेडे, संजय आगलावे, यशवंतराव सालके, भगवान निकम, राजेंद्र डोंगरे, अंबादास जमदाडे, श्रीकांत कांबळे, विजय बर्डे, शितल चौधरी, मनीषा फटांगरे, स्वाती बेद्रे, क्षितिजा जपे, आदिंसह लेखा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.