Robbery : श्रीगोंदा : कणसेवाडी ते श्रीगोंदा रोडवर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पर्दाफाश केला आहे. २८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात दोन सराईत गुन्हेगार जाळ्यात सापडले असून, त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. राहुल जसका काळे (वय २३, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर, प्रवीण महेंद्र चव्हाण (वय १८, रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा असे अटक (Arrest) केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन
तिघे पळून जाण्यात यशस्वी
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, काही संशयित इसम कणसेवाडी शिवारात दोन दुचाकींवरून येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पथकाने तत्परता दाखवत पाठलाग करून राहुल जसका काळे, प्रवीण महेंद्र चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले, तर इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१ लाख ९० हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत (Robbery)
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे आढळून आलेल्या धारदार कोयता, कटावणी, मिरचीची पूड यासारखे घरफोडीचे साहित्य आढळून आल्याने मोठा दरोडा टाकण्याची योजना करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ९० हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



