Fraud : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद; एक कोटी 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंधश्रद्धा निर्माण करून नागरिकांचा विश्वास संपादन

0
Fraud : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद; एक कोटी 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Fraud : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणारी टोळी जेरबंद; एक कोटी 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Fraud : नगर : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या टोळीतील तिघांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली. त्यांच्याकडून भारतीय चलनातील 500 रुपयांच्या 18 हजार 419 बनावट नोटा, बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदांचे बंडल, पाच मोबाईल आणि एक कार असा एकूण 1 कोटी 3 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत जप्त केलेल्या बनावट नोटांची दर्शनी किंमत 92 लाख 9 हजार 500 रुपये आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना 29 सप्टेंबर रोजी गणेश दिलीप शेवाळे (वय 33, रा. कोर्टाजवळ, अशोकनगर, बारामती, हल्ली रा.विनायक कॉलनी, वडगाव रोड, अहिल्यानगर) याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती मिळाली.

नक्की वाचा : बागायती व कोरडवाहू शेतीसाठी शेतीच्या संवर्धनाचा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल : डॉ. विलास खर्चे

कोऱ्या कागदांचे बंडल आढळले

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष शेवाळे याच्या वडगाव रोड परिसरातील घराची झडती घेतली. घरातील जिन्याखाली ठेवलेल्या पिशवीत भारतीय चलनाच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कोऱ्या कागदांचे बंडल आढळून आले. त्यानंतर गणेश शेवाळेसह सुमित विकास चंदनशिवे (वय 25, रा. तांदुळवाडी, बारामती) आणि सुरज वसंत कांबळे (वय 27, रा. झारगडवाडी, बारामती) यांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, गणेश शेवाळे याने जप्त केलेल्या बनावट नोटा त्याचे साथीदार प्रताप धुमाळ (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, रा. बोल्हेगाव) आणि अशोक भिमराज दारकुंडे (रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) यांच्या माध्यमातून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बनावट नोटांचा वापर (Fraud)

या नोटा अशोक दारकुंडे याच्या फॉर्च्युनर गाडीतून मालेगाव येथील अम्मू (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याकडून 25 हजार रुपयांना घेतल्याचेही चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील प्रताप धुमाळ, अशोक दारकुंडे आणि अम्मू हे तिघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.आरोपी नागरिकांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत होते. त्यासाठी अंधश्रद्धा निर्माण करून नागरिकांचा विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक करण्यासाठी बनावट नोटांचा वापर केला जात असल्याची माहिती चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक संदिप दरवडे तसेच पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहीद शेख, संदिप पवार, विष्णु भागवत, सुयोग सुपेकर, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड आणि भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here