Nana Patekar Death : नाना पाटेकर यांचा रात्री २:३० वाजता मित्राला मेसेज ; डॉक्टरांनी सांगितलं शेवटच्या तासांत काय घडलं?

0
Nana Patekar Death : नाना पाटेकर यांचा रात्री २:३० वाजता मित्राला मेसेज ; डॉक्टरांनी सांगितलं शेवटच्या तासांत काय घडलं?

नगर : जन्माला आल्यापासून आई, वडील, भाऊ कोणी आपल्यासोबत नसतो फक्त मृत्यू आपल्यासोबत असतो, मग त्याची भीती का वाटावी, हे शब्द आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar Death) यांचे. एका पॉडकास्ट मध्ये त्यांनी आपली ही भावना बोलून दाखवली होती. काही अभिनेते हे फक्त एक चांगले कलाकार होत नाहीत तर ते अभिनयाची व्याख्याच बदलून टाकतात. आपल्या दमदार आवाज आणि अभिनयाने कलाविश्वाचा इतिहास लिहिणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. आज हाच हरहुन्नरी कलाकार आपल्याला सोडून गेलाय. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे (Cardiac arrest) त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मात्र संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मात्र वयाच्या ७० वर्षानंतर ही फिट वाटणारा हा अभिनेता नेमका अचानक गेला कसा ? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. तर नेमकं काय घडलं होत? हे पाहू…  

नक्की वाचा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सौंदाळा ग्रामसभेचा ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

नेमकं काय घडलं? (Nana Patekar Death)

मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास एका मित्राला मेसेज करून, अस्वस्थ वाटत असल्याचं आणि डाव्या बाजूला दुखत असल्याचे कळवले होते. पण, रात्रीची वेळ असल्याने त्यांच्या मित्राला वेळेवर मेसेज मिळाला नाही. पहाटे ४ वाजता जेव्हा त्यांच्या मित्राने त्याचा हा मेसेज पाहिला तेव्हा तो मित्र तात्काळ त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा नाना पाटेकर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ते घामाने चिंब भिजलेल्या अवस्थेत होते. यानंतर त्यांचे केअरटेकर रुग्णालयातून रुग्णवाहिका घेऊन पोहोचले. मात्र तोपर्यंत नाना पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. त्यानंतर, त्यांना घरातूनच सीपीआर देत रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झालेला होता. किंवा असं म्हणता येईल वेळेला काहीतरी वेगळंच मान्य झालं होत.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कर्जमाफीचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश (Nana Patekar Death)

डॉ. शेखर साळकर यांनी सागितले की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पहाटे ४:२० च्या सुमारास मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, ते वाचू शकले नाहीत आणि पहाटे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकर यांची यांची वैद्यकीय हिस्ट्री या रुग्णालयाकडे उपलब्ध नव्हती. यामुळे निधनाचे अचूक कारण स्पष्ट करण्यासाठी नियमानुसार मेडिको-लीगल केस (MLC) नोंदवण्यात आली असून पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे पाटवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच निधनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं सांगण्यात आलय. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सध्या नाना पाटेकर यांचे पार्थिव ठेवण्यात आलं आहे. आज सायंकाळी पाच वाजता पुण्यात त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

१९७८ मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून नानांनी आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील काही वर्षांत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये दमदार भूमिका करत अभिनय जगतात आपला ठसा उमटवला. आज त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीतील एक तारा निखळला आहे.