नगर : अभिनेते नाना पाटेकर (Actor Nana Patekar) यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) हे नाना पाटेकरांवर बोलताना अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. नाना पाटेकर यांचे कार्य दीपस्तंभासारखं आहे. त्यांनी खूप मोठं काम केलं. असा माणूस होणार नाही, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नक्की वाचा : नाना पाटेकर यांचा रात्री २:३० वाजता मित्राला मेसेज ; डॉक्टरांनी सांगितलं शेवटच्या तासांत काय घडलं?
‘नाना सारखा माणूस होणार नाही’ (Anna Hazare)
नाना पाटेकर गेल्याचं वृत्त ऐकून अण्णा हजारेही अस्वस्थ झाले. मीडियासमोर त्यांना अश्रू आवरणं कठिण झालं. नाना सारखा माणूस होणार नाही. त्यांनी फार मोठं काम केलंय. नुसतं काम केलं नाही, वादळी सागरात संचार करणाऱ्या नौकांना जसा दिपस्तंभ आधार असतो, तसं नाना पाटेकरांचं जीवन दीपस्तंभासारखं आधार होतं. समाज आणि देशासाठी नाना पाटेकर दीपस्तंभासारखे आधार होते. त्यांनी केवळ एकाच क्षेत्रात काम केलं नाही. त्यांनी सर्वच क्षेत्रात खूप मोठं काम केलं. साधा पाण्याचा प्रश्न त्यांनी उचलून धरला. पाणी अडवा, पाणी जिरवा. हे त्यांनी कृतीने करून दाखवलं, असं अण्णा हजारे म्हणाले. अशी माणसं होणार नाही. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
अवश्य वाचा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सौंदाळा ग्रामसभेचा ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
‘काही माणसं समाजाला दिशा देऊन जातात’ (Anna Hazare)
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं. समाजाला दिशा देणारं काम झालं. माणसं येतात जातात. येणं-जाणं हे एका कालचक्रासारखं सुरू आहे. पण काही माणसं समाजाला दिशा देऊन जातात. देशाला नवीन दिशा देऊन जातात, असं काही माणसांचं जीवन असतं. नाना पाटेकरांच्या जीवनात ते पाहायला मिळालं, असंही अण्णा म्हणाले.



