
MLA Akshay Kardile : नगर : तालुक्यातील आई तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुऱ्हाणनगर (Burhannagar) येथे नवरात्राैत्सवा निमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. आमदार अक्षय कर्डिले (MLA Akshay Kardile) यांच्या उपस्थितीत कापूरवाडी, वारूळवाडी, नागरदेवळे, बुऱ्हानगर, आगडगाव यांसह पंचक्रोशीतील विविध गावांतून आणलेल्या देवीच्या ज्योतींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कोल्हापूर येथील देवी, निघोजची मळगंगा देवी, आई तुळजाभवानी आणि मोहटादेवी यांसह विविध दिव्यांच्या मंदिरातून आणलेले ज्योतींच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
शेतकरी बांधवांसाठी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
यावेळी आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची विधिवत महाआरती करण्यात आली. या वेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, आई तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून बुऱ्हानगरची संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम आहे. पंचक्रोशीतील विविध गावांतून देवीच्या ज्योती आणण्याची परंपरा ही आपल्या धार्मिक एकतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. देवीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेला सुखाचे दिवस लाभोत आणि सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी समृद्ध होवोत, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आहे. पंचक्रोशीतील सर्व युवकांनी एकत्र येत कापूरवाडी, वारूळवाडी, नागरदेवळे, बुऱ्हानगर, आगडगाव यांसह विविध गावांतून आणलेल्या देवीच्या ज्योती आई तुळजाभवानी मंदिरात नेल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते महाआरती (MLA Akshay Kardile)
यावेळी आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिरात विधिवत घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. युवकांनी एकजुटीने पुढाकार घेत धार्मिक परंपरा जपल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. ज्योतींचे स्वागत आणि महाआरतीच्या निमित्ताने बुऱ्हानगरसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमातून परिसरातील देवीभक्तांची श्रद्धा आणि परंपरेप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.


