Raid by the Food and Drug Administration : संगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा छापा; १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपचा साठा जप्त

Raid by the Food and Drug Administration : संगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा छापा; १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपचा साठा जप्त

0

Raid by the Food and Drug Administration : नगर : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शुद्ध आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत याकरिता अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे संयुक्त आयुक्त माने आणि अन्न विभागाचे सहायक आयुक्त एस. एच. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा पथकाने संगमनेर येथील एका अन्न प्रक्रिया उद्योगावर धडक कारवाई (Raid by the Food and Drug Administration) केली. या छाप्यात सुमारे १५ लाख ५६६ रुपये किमतीचा संशयास्पद आणि मिसब्रँडेड अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

कमी दर्जाचा व आरोग्याला अपायकारक असल्याचा संशय

हा अन्नपदार्थांचा साठा हा ‘मिसब्रँडेड’ (चुकीची लेबलिंग असलेला) आणि कमी दर्जाचा किंवा आरोग्याला अपायकारक असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या साठ्याचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कडक कारवाई केली जाईल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या पथकाने केली कारवाई (Raid by the Food and Drug Administration)

अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) यु. आर. सूर्यवंशी आणि सहायक आयुक्त (अन्न) परिमंडळ-२ अहिल्यानगर, एस. एच. इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ आणि नियमबाह्य विक्री रोखण्यासाठी प्रशासनाची ही मोहीम अशीच तीव्र गतीने सुरू राहणार असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे