Tofkhana Police Station : नगर : शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Tofkhana Police Station) हद्दीत उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज (MD drugs) प्रकरणात न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. या प्रकरणात तब्बल ३६ लाख ३९ हजार ८७४ रुपये किमतीचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले होते. या कारवाईदरम्यान अपहरण व दरोड्याच्या तयारीसाठी वापरता येतील अशा वस्तूही आढळून आल्याचा पोलिसांचा दावा आहे. गुन्ह्याच्या तपासात एकूण ५६ आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले असून, त्यापैकी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
जिशान शौकत सय्यद, (वय 26,रा. मुकुंदनगर, साहारा कॉलनी, ता. जि. अहिल्यानगर), रिहान जावेद शेख, वय 26,रा. छोटी मरीयम मस्जिद जवळ, मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर), वसिम खलिल बागवान, वय 38 रा.पिंजार गल्ली, ता. जि. अहिल्यानगर), जमीर निसार शेख, वय 37 रा. छोटी मरीयम मश्जिद जवळ, मुकुंदनगर, अहिल्यानगर), दानीश फारुक शेख, वय 29,रा. घर नं. 24/80 जुनी घासगल्ली, तांबटकर गल्ली, ता जि अहिल्यानगर), अलीरजा शकील शेख, वय 19,रा. पोलीस चौकी जवळ, गोविंदपूरा, मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर), मोहंमद उर्फ कासिफ सज्जाद खान, वय 26 ,रा. मोठया मस्जिद जवळ, वसीम ज्वेलर्स जवळ, मुकुंदनगर), परवेज उर्फ अप्पु खड्डा असदअली सय्यद, वय 31,रा. शहा कॉलणी, गोंविंदपुरा), शाहिद शकील शेख वय 23, रा.हडपसर, सय्यदनगर, महंमदवाडी रोड, लेन नं. 99 पुणे), साद इक्बाल इनामदार (शेख) वय 26,रा.पुणे वानवडी केदारी पेट्रोल पंपाजवळ, परमार गार्डन सोसायटी पुणे), दिनेश तुषार यादव, वय 23 रा. इस्कॉन मंदीर जवळ, कादंबरी नगरी, फेज 4, सावेडी अहिल्यानगर), कामरान कलीम शेख, वय 26,रा. घर नं. 510, शुक्रवार बाजार, लकी चिकनशॉप जवळ, भिंगार कॅम्प), अशरफ (अश्रफ) ऊर्फ हाजी नदीम शेख, वय 23 ,रा. दिपाली टॉकीज समोर, झेंडीगेट, अहिल्यानगर), अरशान रशीद सय्यद उर्फ मामा वय 29,रा. दबरा हजारी दर्गा, फकिरवाडा, ता. नगर जि. अहिल्यानगर), शाहरुख उर्फ पार्टी असलम शेख, वय – 31, रा. आयेशा मस्जिदजवळ, गोविंदपुरा, मुकुंदनगर,अहिल्यानगर), अझहर वाहीदअली सय्यद , वय – 35, रा. चाँद टेलर जवळ, वेल्जी हाईटस, झेंडीगेट), अनिकेत राहुल गायकवाड, वय 27, रा.तरवडे वस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर ता.हवेली जि.पुणे), झुल्करनेन अमनउल्लाशाहीद सय्यद वय 21 , रा. ख्रिस्तगल्ली, कैलास उडपी समोर, ता.नगर जि.अहिल्यानगर), विजय उर्फ घाज्या अनिल बोर्डे वय 26 रा.वसीम मुकुंदनगर ता.जि.अहिल्यानगर), साजिद ताहेर शेख ऊर्फ मुंबई वय 28 रा.कोठला मस्तानशहा चौक, ह.रा.आलमगीर), आफताब ऊर्फ तौफिक राजु पठाण, वय 25 ,रा.रामगड, ए – 1 सर्व्हिस सेंटर बेलापुर, ता.श्रीरामपुर), अमिन शौकत शेख , वय 28 वर्ष टाकळीकाझी, ता.नगर), निलेश दिपक जाधव वय – 32 , रा. लक्ष्मीनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
माहिती संकलित करून कारवाईचे निर्देश(Tofkhana Police Station)
अहिल्यानगर जिल्हा नशामुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांची माहिती संकलित करून कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर २० जुलै २०२६ रोजी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी विक्रीच्या उद्देशाने एमडी ड्रग्ज बाळगल्याचा तसेच रबरी मुखवटे, चाकू, हँडग्लोव्हज, दोरी, पान्हे आणि प्लास्टिक पिस्तूल यांसारख्या वस्तू जवळ ठेवल्याचा आरोप संबंधितांवर आहे. अपहरण आणि दरोड्याच्या तयारीशी संबंधित बाबीही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा प्राथमिक तपास तोफखाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केला. सुरुवातीला दहा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि पोलीस अंमलदार विकास साळवे, संतोष खैरे, शाहिद शेख, संदीप पवार, पंकज व्यवहारे, विजय ठोंबरे, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
या पथकाने अटक आरोपींकडून ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता आणि त्याची विक्री कोणाला केली जात होती, याचा शोध घेण्यासाठी तपास केला. तांत्रिक विश्लेषणासह पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याची पुढील आणि मागील साखळी तपासण्यात आली. या तपासातून एकूण ५६ आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यापैकी २३ जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. मात्र, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांनी न्यायालयात उपस्थित राहून पुरावे आणि कायदेशीर बाबींच्या आधारे आरोपींच्या जामिनाला विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने संबंधित आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
फरार आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २३ आरोपींची नावे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. तसेच, तपासात निष्पन्न झालेल्या आणि अद्याप अटक न झालेल्या ३३ आरोपींची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.



