Rasta Roko Movement : पारनेर : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या घरफोडी (Burglary) प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरीस गेलेले दहा तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व रोख रक्कम हस्तगत करावी, अन्यथा येत्या ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वासुंदा चौक येथे रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) करण्यात येईल, असा इशारा मंगल संतोष गोरडे यांच्यासह टाकळी ढोकेश्वर येथील महिलांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
नक्की वाचा : अकोले तालुक्यात दोडक्याच्या पिकात गांजाची झाडे; १५ लाख ३६ हजारांचा गांजा जप्त
गोरडे कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान
टाकळी ढोकेश्वर येथील मंगल गोरडे यांच्या घरात दि. २५ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तातडीने फिर्याद दाखल करण्यात आली. मात्र, घटनेला पाच दिवस उलटूनही चोरट्यांचा शोध लागलेला नसून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत झालेला नाही. त्यामुळे गोरडे कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, टाकळी ढोकेश्वर व परिसरात यापूर्वीही अनेक लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांचाही तपास लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन (Rasta Roko Movement)
परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने प्रभावी कारवाई करावी, चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. चोरीच्या प्रकरणाचा तातडीने छडा न लागल्यास दि. ४ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यावर महिला ठाम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्र तसेच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.
यावेळी माजी सरपंच शिवाजी खिलारी, उपसरपंच किरण तराळ, सुनील गोरडे, ग्रामपंचायत सदस्य शुभम गोरडे, जयसिंग झावरे पाटील, विश्वनाथ बांडे, सौ. अंजनाबाई विश्वनाथ बांडे, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास झावरे, संजय झावरे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करावे : विक्रम झावरे
टाकळी ढोकेश्वर व परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन हे मंजूर झाले आहे मात्र ते लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांना परिसरात प्रभावी गस्त घालणे, गुन्ह्यांचा तातडीने तपास करणे आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणे शक्य होईल. शासन व पोलीस प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विक्रम झावरे यांनी केली.



