Clash between two groups over firecrackers : अहिल्यानगरमध्ये फटाके फेकण्यावरून दोन गटांत राडा; महिलेला मारहाण, विनयभंगाचा आरोप

Clash between two groups over firecrackers : अहिल्यानगरमध्ये फटाके फेकण्यावरून दोन गटांत राडा; महिलेला मारहाण, विनयभंगाचा आरोप

0

Clash between two groups over firecrackers : नगर : शहरातील फुलसौदर चौक परिसरात रस्त्यावर सुतळी बॉम्ब फेकण्याच्या प्रकारावरून दोन गटांत जोरदार वाद होऊन (Clash between two groups over firecrackers) हाणामारी झाल्याची घटना रविवारी (ता. ८) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यावेळी एका महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग (Woman assaulted and molested) केल्याचा आरोप असून, महिलेच्या नातेवाइकांनाही मारहाण करण्यात आल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) देण्यात आली आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार

या प्रकरणी मोईनुद्दीन बागवान याच्यासह समीर युसुफ बागवान, ताहेर मजिदउल्ला खान, आफन जावेद शेख, अमन राजू बागवान आणि इतर दोन ते तीन जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जीवितास धोका निर्माण होईल असे फटाके फेकले (Clash between two groups over firecrackers)

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फुलसौदर चौकातील जंगदबा भोजनालयासमोर काही महिला बसल्या असताना परिसरातील काही मुले हातातील सुतळी बॉम्ब पेटवून रस्त्यावर फेकत होती. यातील एका बॉम्बच्या स्फोटामुळे जमिनीवरील बारीक दगड उडून महिलांच्या अंगावर पडले. तसेच परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने फटाके फेकले जात असल्याने संबंधित महिलांनी मुलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, संबंधित मुलांचा शोध घेत असताना फायर पानटपरी परिसरात वाद निर्माण झाला. यावेळी महिलेच्या भावाने फटाके फेकण्याबाबत जाब विचारला असता काही तरुणांनी त्यांच्याशी वाद घालत धाव घेतली. त्यानंतर एका तरुणाने महिलेचा उजवा हात धरून तिला स्वतःकडे ओढले, चापट मारून बाजूला ढकलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वाद वाढल्यानंतर महिलेचा भाऊ आणि मानलेला भाऊ मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांनाही काही तरुणांनी झटापट करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांकडून पुढील तपास सुरू केला आज आहे.