Leopard : नगर : तालुक्यातील मजले चिंचोली (Majle Chincholi) शिवारात बिबट्याने (Leopard) पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एकाच रात्रीत चार बोकड आणि सहा शेळ्यांचा फडशा पाडला. सोमवारी (ता. ९) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पशुपालकांमध्ये (The Livestock Farmer) चिंतेचे सावट पसरले आहे.
नक्की वाचा : ऊस दरासाठी राहुरीत बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरु; वाहतुकीची प्रचंड कोंडी
शेख कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान
मजले चिंचोली शिवारातील हसन अल्लाबक्ष शेख यांच्या गट क्रमांक ७८ मधील शेळ्यांच्या शेडमध्ये पहाटे बिबट्याने प्रवेश करून शेळ्या-बोकडांवर हल्ला केला. या हल्ल्यात चार बोकड आणि सहा शेळ्यांचा मृत्यू झाला. ऐन दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या शेख कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेल्या हसन शेख यांच्या एकूण दहा शेळ्या-बोकडांचा बिबट्याच्या हल्लूयात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा; ग्रामस्थांची मागणी (Leopard)
पशुधनाचे झालेले नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहावरच घाला घालणारे ठरले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करुन शेख कुटुंबीयांना नुकसानभरपाई देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी मजले चिंचोली तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.



