Local Crime Branch : अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक; एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे

Local Crime Branch : अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक; एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे

0
Local Crime Branch : अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक; एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे
Local Crime Branch : अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक; एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे

२ लाख ३ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त

Local Crime Branch : नगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) धडक मोहीम राबवत एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत जुगार, अवैध दारू विक्री (Illegal sale of liquor) आणि गुटखा विक्रीप्रकरणी एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २ लाख ३ हजार ३३९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांचे अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पाच पथके तयार केली. या पथकांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती संकलित करून छापे टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पथकांनी विविध ठिकाणी टाकले छापे (Local Crime Branch)

त्यानुसार १३ नोव्हेंबर रोजी कर्जत, तोफखाना, राहुरी, पारनेर आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. जुगार अड्डे, अवैध दारू विक्री आणि गुटखा विक्री करणाऱ्यांना लक्ष्य करत पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत जुगाराच्या तीन गुन्ह्यांमध्ये १ लाख २७ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू विक्रीच्या १२ गुन्ह्यांमध्ये ६२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर गुटखा विक्रीच्या एका गुन्ह्यात १३ हजार ३२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा एकूण १६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात एकाच दिवशी करण्यात आलेल्या या व्यापक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.