
Sports Complex : श्रीगोंदा : तालुका क्रीडा संकुल (Sports Complex) गेल्या दहा वर्षांपासून धुळखात पडले असून, पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने त्यांना करिअरसाठी धावधाव करावी लागत असल्याने क्रीडा संकुलाच्या जागेत ४०० मीटरचा धावण्याचा ट्रॅक (Running Track) आणि दिवाबत्तीची सोय करावी अशी मागणी विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत ओगले (Prashant Ogle) यांनी केली आहे.
नक्की वाचा : थोरात कारखान्याची ३२०० रुपयांची पहिली उचल अमान्य; शेतकरी नेते आक्रमक
अभ्यासिकेचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे
दुसरीकडे, नगरपरिषद हद्दीतील अपूर्ण अभ्यासिकेचे बांधकाम रखडल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी अभ्यासिकेचे बांधकाम तातडीने पूर्ण करून ती खुली करावी.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तीव्र आंदोलनाचा इशारा (Sports Complex)
मैदान आणि अभ्यासिका या युवकांच्या दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने पाहत दोन्ही सुविधा तातडीने कार्यान्वित कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा युवकांनी दिला आहे. यावेळी शरद चाकणे, संतोष भोईटे, एड. सुमित बोरुडे, डॉ. गोरख बाईकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते.


