Drought : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिका अलर्ट; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे संकेत

Drought : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिका अलर्ट; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे संकेत

0

Drought : नगर : जिल्ह्यात दुष्काळाची (Drought) तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अहिल्यानगर महापालिकेने (AMC) पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आयुक्त यशवंत डांगे, महापौर ज्योती गाडे (Mayor Jyoti Gade) यांच्यासह नगरसेवक आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत पाणीगळती रोखणे, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, ग्रामीण भागाला टँकरने पाणीपुरवठा करणे आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.

पाणीगळती तातडीने थांबविण्याची गरज

नगरसेवक अविनाश घुले यांनी दुष्काळी परिस्थितीचा विचार करता महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल उपस्थित केला. शहरात अनेक ठिकाणी पाणीगळती होत असल्यास ती तातडीने थांबविण्याची गरज आहे. गळतीच्या तक्रारी मिळताच संबंधित ठिकाणी कर्मचारी पाठवून दुरुस्ती केली पाहिजे. आगामी काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरणार असून, यासाठी नगरसेवकही लक्ष ठेवणार आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या दर महिन्याला नियमित बैठका घेण्यात याव्यात, दुष्काळाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशा मागण्याही घुले यांनी केल्या. पाणी वाचविण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून नगरसेवकांचीही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बोअरवेलच्या वापरणाऱ्यांवर कारवाई न करण्याची मागणी (Drought)

नगरसेवक संपत बारस्कर यांनी पाणीपुरवठा विभागाप्रमाणेच महापालिकेच्या इतर विभागांच्याही नियमित आढावा बैठका घेण्याची सूचना केली. शहरातील पाणीपुरवठ्याचे व्हॉल्व्ह पूर्वी जमिनीवर असल्याने वाहनांचे नुकसान होत होते. मात्र, ते जमिनीखाली घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याचा वापर न करता बोअरवेलच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

Drought : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिका अलर्ट; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे संकेत
Drought : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिका अलर्ट; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे संकेत

ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महापालिकेने ग्रामीण भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांतून प्रेरणा घेत हा उपक्रम राबविल्यास सामाजिक एकतेचा चांगला संदेश जाईल, असे बारस्कर म्हणाले.

यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. महापालिकेकडे सध्या २८ कोटी रुपयांची थकबाकी असून, महावितरणकडून वीजजोडणी कधीही खंडित केली जाऊ शकते. शहरातच पाण्याची कमतरता असताना ग्रामीण भागाला पाणी देण्याबाबत नियोजनपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. ‘आपल्या टोपल्यात भाकरी नाही आणि गावाला जेवायला वाढायचे’, अशी परिस्थिती असल्याचे सांगत त्यांनी आर्थिक अडचणी स्पष्ट केल्या.

नगरसेवक मयूर बांगरे यांनी अनेक प्रभागांत सुरुवातीला दूषित पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा मुद्दा मांडला. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आगामी काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वॉशिंग सेंटर आणि स्विमिंग पूल बंद करण्याबाबतही महापालिका विचार करत असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक सागर बोरुडे, मनोज कोतकर, प्रकाश भागानगरे, दिपाली बारस्कर, वर्षा सानप, करण कराळे, मनोज दुलम यांच्यासह अन्य नगरसेवक व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.