Gang preparing for a robbery apprehended : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; पुणे जिल्ह्यातील मोक्कातील फरार आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात

Gang preparing for a robbery apprehended : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; पुणे जिल्ह्यातील मोक्कातील फरार आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात

0
Gang preparing for a robbery apprehended : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; पुणे जिल्ह्यातील मोक्कातील फरार आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात
Gang preparing for a robbery apprehended : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; पुणे जिल्ह्यातील मोक्कातील फरार आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात

Gang preparing for a robbery apprehended : नगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर (Gang preparing for a robbery apprehended) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून तीन दुचाकी, तीन मोबाईल, कटावणी, कोयता, मिरची पूड यासह २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेल्यांपैकी एक आरोपी पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत गुन्ह्यात फरार होता.

या तिघांना घेतले ताब्यात

पोलिसांनी पाठलाग करून बाक्या बंड्या काळे (वय ३९), गोट्या बंडू काळे (वय २५, दोघे रा. आखोणी, ता. कर्जत) आणि धोंड्या ईश्वर भोसले (वय २८, रा. बेलगाव, ता. कर्जत) या तिघांना ताब्यात घेतले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या नेतृत्वाखाली कारवाई (Gang preparing for a robbery apprehended)

जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष पेट्रोलिंगच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले होते.


कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना राशीन ते चिलवडी मार्गावरून काही जण मोटारसायकलवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिराच्या माळावर सापळा रचला.

दरम्यान, संशयित तीन दुचाकीवरून येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच संशयितांनी मोटारसायकली जागेवर सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून बाक्या बंड्या काळे (वय ३९), गोट्या बंडू काळे (वय २५, दोघे रा. आखोणी, ता. कर्जत) आणि धोंड्या ईश्वर भोसले (वय २८, रा. बेलगाव, ता. कर्जत) या तिघांना ताब्यात घेतले.


चौकशीदरम्यान त्यांच्यासोबत असलेले संशयित आरोपी शुभम गहिनीनाथ भोसले (रा. बेलगाव), रोहित नितीन चव्हाण आणि सुमित नितीन चव्हाण (दोघे रा. केडगाव, ता. अहिल्यानगर) हे तिघे पळून गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन दुचाकी, तीन मोबाईल, एक कटावणी, पान्हा, मिरची पूड, कोयता आणि स्क्रू ड्रायव्हर असा एकूण २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ताब्यातील धोंड्या ईश्वर भोसले हा पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा मध्ये फरार होता. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी केली.