Attack on a young man : लोखंडी रॉड अन् चॉपरने तरुणावर हल्ला; चौघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Attack on a young man : लोखंडी रॉड अन् चॉपरने तरुणावर हल्ला; चौघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Attack on a young man : नगर : जुन्या वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना अहिल्यानगर शहरातील बंजारा गल्ली परिसरात घडली. या घटनेत एका व्यक्तीला लोखंडी रॉड आणि चॉपरने मारहाण करून जखमी (Attack on a young man) करण्यात आल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) दाखल झाली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

चॉपरने डोक्यावर वार करून जखमी केल्याची फिर्याद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन तुकाराम जाधव (वय ४८) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १९ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे पावणे एकच्या सुमारास बंजारा गल्ली परिसरात ही घटना घडली. फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेले इतर व्यक्ती कार्यक्रमावरून घरी जात असताना संशयित आरोपी कारमधून तेथे आले. त्यांनी फिर्यादीला लोखंडी रॉडने डाव्या हातावर मारहाण केली. तसेच एका आरोपीने हातातील चॉपरने त्यांच्या डोक्यावर वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Attack on a young man)

यानंतर इतर आरोपींनीही फिर्यादीला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक सचिन तुकाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत मुर्तडकर, प्रथमेश थोरात गोपाल विनोद मालपाणी (सर्व रा. वांजर गल्ली), चिकू खरपुडे यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.