Nilesh Lanke : नगर : जिल्हा सहकारी बँकेच्या (District Cooperative Bank) निवडणुकीत संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा नागरी सन्मान रविवारी (ता. 22) अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा वाजता स्टेशन रोडवरील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार असल्याची
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विशेषतः नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विरोधी पॅनेलच्या तुलनेत अधिक मते मिळविली. पारनेर सेवा संस्था मतदारसंघातून लंके यांनी 24 मतांच्या फरकाने विजय मिळविला. या निकालातून त्यांच्या नेतृत्वाला सहकार क्षेत्रातील मतदारांनी दिलेला प्रतिसाद अधोरेखित झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
नक्की वाचा : चर्चगेट स्थानकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे, सौंदर्यस्थळाचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे
यांची उपस्थिती असणार
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे, बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित आर. आर. पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, केदारेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रताप काका ढाकणे, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. सीताराम काकडे आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे उपस्थित राहणार आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आयोजकांच्या वतीने आवाहन (Nilesh Lanke)
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, निलेश लंके प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन आणि आपला मावळा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी केले आहे. अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), नीलेश लंके प्रतिष्ठान आणि आपला मावळा यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नागर सत्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



