Comprehensive Database : कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2026 अद्ययावत करण्याचे आवाहन

शासकीय कार्यालयांनी माहितीकोष 2026 मधील माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्रथम प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य

0
Comprehensive Database : कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2026 अद्ययावत करण्याचे आवाहन
Comprehensive Database : कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2026 अद्ययावत करण्याचे आवाहन

Comprehensive Database : नगर : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2026 (Comprehensive Database) अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती विहित नमुन्यात अचूक व परिपूर्ण भरून निर्धारित वेळेत अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त दीपक दातीर (Deepak Datir) यांनी केले आहे.

नक्की वाचा : लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहावी : जिल्हाधिकारी

माहिती अचूक व परिपूर्ण असल्याची खात्री करावी

जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO) यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती 1 जुलै 2026 रोजीच्या स्थितीनुसार माहितीकोषात नोंदविणे आवश्यक आहे. माहिती भरताना अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी तसेच वैयक्तिक व सेवाविषयक तपशील अद्ययावत करणे आवश्यक आहे. माहितीकोषात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तपशिलासोबतच जुलै 2026 च्या वेतन देयकानुसार मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती तसेच सेवापुस्तिकेनुसार आवश्यक तपशील नोंदविणे बंधनकारक आहे. भरलेली माहिती अचूक व परिपूर्ण असल्याची खात्री संबंधित कार्यालयप्रमुखांनी करावी.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रथम प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य (Comprehensive Database)

सर्व शासकीय कार्यालयांनी माहितीकोष 2026 मधील माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्रथम प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य आहे. ज्या कार्यालयांनी सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र प्राप्त केले नसेल, त्यांची नोव्हेंबर 2026 महिन्याची वेतन देयके डिसेंबर 2026 मध्ये स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे विलंब होऊ नये यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी माहितीकोषाचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली माहिती अचूक भरली गेली असल्याची खात्री करावी, असे आवाहन उपआयुक्त दातीर यांनी केले आहे.