
Seminar on issues concerning single women in Delhi : राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) शनिवारी नवी दिल्ली येथे “भारतातील एकल महिलांचे अधिकार आणि आव्हाने” या विषयावर एका राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन केले होते. देशभरातील एकल महिलांसमोर (Seminar on issues concerning single women in Delhi) असलेली कायदेशीर, सामाजिक आणि आर्थिक आव्हाने यांवर चर्चा करून धोरणाच्या दिशेने वाटचाल करणे यासाठी आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कर्नाटकच्या राज्यपाल डॉ. सुधा यादव राष्ट्रीय परिषदेच्या प्रमुख पाहुण्या होत्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर (Vijaya Rahatkar) या अध्यक्षस्थानी होत्या. देशाच्या विविध राज्यातून संस्था, अभ्यासक, केंद्रीय स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.
हेरंब कुलकर्णी या परिषदेसाठी आमंत्रित
साऊ एकल महिला समितीचे संस्थापक राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांना या परिषदेसाठी आमंत्रित केले होते. त्यांनी या परिषदेत सुरुवातीलाच महाराष्ट्रात साऊ एकल महिला समितीने शासन यंत्रणांना सोबत घेऊन सुरू असलेल्या कार्याची माहिती या परिषदेसाठी देशभरातील आलेल्या प्रतिनिधींसमोर विस्ताराने मांडली. कुलकर्णी यांच्या सोबत साऊ एकल महिला समितीच्या समन्वयक
किरण हिवराळे (जिल्हा अकोला), अरुणा डकले (संभाजीनगर), अलका लोखंडे (औसा लातूर ), शबाना शेख ( सांगली ), चंदा आतकर ( सोलापूर ) यांना परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महिलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी चर्चासत्र (Seminar on issues concerning single women in Delhi)
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी देशातील या दुर्लक्षित महिलांच्या दुखा:कडे लक्ष वेधत या महिलांना शासनाची साथ मिळवून देत या महिलांना स्वयंपूर्ण करत या महिलांना सामाजिक प्रतिष्ठा व आत्मसन्मान मिळवून देणे यासाठी हे चर्चासत्र असून देशपातळीवर विविध राज्यांच्या योजना एकत्र केल्या जाऊन त्याचा अभ्यास केला जाईल.
हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्हा परिषदेने केलेले सर्वेक्षण, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची केलेली मोजणी, बालसंगोपन योजना, उच्च शिक्षण विभाग करत असलेले प्रयत्न, बचत गटाच्या एकल महिलांसाठी तालुकास्तरावर झालेल्या रोजगार कार्यशाळा व महाराष्ट्र सरकार करत असलेले एकल महिलांचे धोरण याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक एकल महिलांचे गंभीर प्रश्न आणि मालमत्ता हक्क व कोर्टामध्ये होणारा विलंब याकडेही लक्ष वेधले.
राष्ट्रीय महिला आयोगाने विविध राज्यातील योजनांचे एकत्रीकरण करून देश पातळीवर एकल महिला धोरणाची प्रारूप तयार करावे व सर्व राज्य सरकारांना एकल महिला धोरण पुढील वर्षीच्या जनगणनेपूर्वी लागू करण्याचे निर्देश द्यावेत, असेही ते म्हणाले.
.
विविध मंत्रालये आणि विभागांचे प्रतिनिधी, विद्यापीठांचे कुलगुरू, विषयातील तज्ज्ञ, सामाजिक संस्था प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या, कर्नाटकच्या राज्यपाल डॉ. सुधा यादव यांनी छापील भाषण बाजूला ठेवत स्वतः एकल महिला म्हणून त्यांच्या आयुष्याचा प्रवास त्यांनी सांगितला.
.
स्नेहालय संस्थेचे ॲड शाम असावा यांनीही या चर्चासत्रात महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे उपस्थित केले..
महाराष्ट्रात सरकार एकल महिलांचे धोरण करत असताना देशपातळीवर महिला आयोगाने या प्रश्नावर पुढाकार घेतल्याबद्दल आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचे साऊ एकल महिला समितीचे वतीने अभिनंदन करण्यात आले.


