Constitution Day : संविधानाच्या सन्मान राखणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : दादासाहेब गीते यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर शहरात संविधान जागर महोत्सव उत्साहात

0
Constitution Day : संविधानाच्या सन्मान राखणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : दादासाहेब गीते यांचे प्रतिपादन
Constitution Day : संविधानाच्या सन्मान राखणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : दादासाहेब गीते यांचे प्रतिपादन

Constitution Day : नगर : भारतीय संविधानातील (Constitution) न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाही मूल्यांचा जागर करत संविधानाप्रती कटिबद्ध राहण्याचा निर्धार अहिल्यानगरकरांनी संविधान दिनानिमित्त व्यक्त केला. मानवाधिकार अभियान, बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था आणि सहायक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभाग (Social Welfare Department) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्ह्यातील विविध पुरोगामी संस्था, संघटना, महाविद्यालये आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून गुरुवार, (ता. २६) संविधान जागर महोत्सवांतर्गत भव्य संविधान जागर रॅली (Awareness Rally) व संविधान जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. संविधान सन्मानाच्या घोषणा, सामाजिक प्रबोधनपर गीते आणि महामानवांना अभिवादन करत उत्साहपूर्ण वातावरणात ही रॅली पार पडली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इम्पिरियल चौक येथून सुरू झालेली रॅली महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर सीएसआरडी महाविद्यालय येथे आयोजित संविधान जागर सभेने रॅलीचा समारोप झाला. यंदाच्या नवव्या वर्षातील संविधान जागर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेंद्र धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आणि उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.संतोष गायकवाड, मानवाधिकार अभियानाचे उपाध्यक्ष संध्या मेढे, समाजकल्याण विभागाच्या विशेष अधिकारी सावित्रा लबडे, लेखाधिकारी संदीप देठे आदी मान्यवर उपस्थित होते.

नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थ्याला शिपायाकडून मारहाण; अभ्यास सोडून मातीच्या गाड्या भरण्याची जबरदस्ती, तक्रार दाखल

Constitution Day : संविधानाच्या सन्मान राखणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : दादासाहेब गीते यांचे प्रतिपादन
Constitution Day : संविधानाच्या सन्मान राखणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : दादासाहेब गीते यांचे प्रतिपादन

जबाबदारीची भूमिका घेणे गरजेचे

निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक नागरिकाने संविधानाप्रती सदैव कटिबद्ध राहणे आवश्यक आहे. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता ती आपल्या दैनंदिन व्यवहारात आणि आचरणात उतरली पाहिजेत. प्रशासनात कार्यरत असताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संवेदनशीलता, तत्परता आणि जबाबदारीची भूमिका घेणे गरजेचे आहे. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी संविधान निर्मितीचा ऐतिहासिक प्रवास, सामाजिक समता आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत प्रत्येकाने आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख व्याख्याते संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांनी भारतीय संविधान व मानवी हक्क या विषयावर सखोल विवेचन केले. संविधानाची उद्देशिका, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि मानवी हक्क यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत संविधानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. संविधान हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून त्यातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठी निरंतर प्रयत्न होणे आवश्यक आहे. संविधानाचा जागर केवळ संविधान दिनापुरता मर्यादित न ठेवता तो वर्षभर आणि प्रत्येकाच्या आचरणातून झाला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Constitution Day : संविधानाच्या सन्मान राखणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : दादासाहेब गीते यांचे प्रतिपादन
Constitution Day : संविधानाच्या सन्मान राखणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : दादासाहेब गीते यांचे प्रतिपादन

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी योगदान द्यावे (Constitution Day)

सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी संविधान आणि वर्तमान सामाजिक परिस्थिती यावर प्रबोधनात्मक संवाद साधला. संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे. संविधानाचा सन्मान करण्याबरोबरच त्यातील मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेली भाषणे प्रत्येकाने वाचली आणि अभ्यासली पाहिजेत. संविधानातील तरतुदी व तत्त्वांची प्रामाणिक अंमलबजावणी करणे हीच महापुरुषांना खरी श्रद्धांजली ठरेल. संविधानाने दिलेले अधिकार वंचित आणि उपेक्षित समूहांपर्यंत पोहोचवून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

संविधान जागर महोत्सवाचे नववे वर्ष

मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी प्रास्ताविकात मानवाधिकार अभियानाच्या वतीने दरवर्षी संविधान दिन उत्साहात साजरा केला जात असल्याचे सांगितले. यंदा संविधान जागर महोत्सवाचे नववे वर्ष असून अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पुरोगामी संस्था, संघटना, महाविद्यालये आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा संविधानिक मूल्यांप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे स्वागत व उपस्थितांची ओळख डॉ. राजेंद्र धामणे यांनी करून दिली तसेच मन व घर हरवलेल्या महिलांच्या मानवी अधिकाराच्या प्रश्नावर उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन संध्या मेढे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सॅम्युअल वाघमारे यांनी केले, तर आभार डॉ. प्रदीप जारे यांनी मानले.

या संविधान जागर महोत्सवात यावेळी कार्यक्रमास सीएसआरडीचे डॉ.सुरेश मुगुटमल, डॉ.विजय संसारे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सब्बन, भैरवनाथ वाकळे, अर्षद शेख, डॉ. प्रशांत शिंदे, नीलिमा बंडेलू, शिवाजी नाईकवाडी, संजय झिंजे, संजय कांबळे, अॅड. विजया शिंदे, बार्टीचे दिलावर सय्यद, बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्यासह मानवाधिकार अभियानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सीएसआरडी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधानातील लोकशाही मूल्ये समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा आणि ती प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याचा सामूहिक संकल्प या महोत्सवाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.