
Constitution Day : नगर : भारतीय संविधान दिनानिमित्त (Constitution Day) समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान गौरव दिन’ कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सहभाग घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.यावेळी मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या समवेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
नक्की वाचा : संविधानाच्या सन्मान राखणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : दादासाहेब गीते यांचे प्रतिपादन

संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सन्मानित
या माध्यमातून संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचा जागर करण्यात आला. या प्रसंगी आंबेडकरी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल त्यांनी समाजबांधवांचे आभार व्यक्त केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Constitution Day)
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ आहे. संविधानामुळे देशात समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये रुजली आहेत. भारतीय संविधान हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशवासीयांचा अभिमान आहे. त्यामुळे संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे.
याप्रसंगी नगरसेवक सुरेश बनसोडे यांनीही संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास आंबेडकरी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाच्या मूल्यांप्रती आदर व्यक्त करत उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम झाला.


