Aarya 3 : सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’चा टीझर आऊट

सुष्मिताच्या 'आर्या' आणि 'आर्या २' या वेबसीरिजने  प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता 'आर्या ३' च्या माध्यमातून धमाका करण्यासाठी सुष्मिता सज्ज आहे.

0
Aarya 3

Aarya 3 : नगर : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा ओटीटी (OTT) गाजवण्यासाठी सज्ज आहे. सुष्मिताची ‘आर्या ३’ (Aarya 3) ही बहुप्रतीक्षित सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीझर समोर आला आहे. सुष्मिताच्या ‘आर्या’ (Aarya) आणि ‘आर्या २’ या वेबसीरिजने  प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता’आर्या ३’ च्या माध्यमातून धमाका करण्यासाठी सुष्मिता सज्ज आहे.

नक्की वाचा : क्रिकेटपटू मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित

‘आर्या ३’ या सीरिजचा दमदार टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये सुष्मिता सेन तलवार घेऊन लढताना दिसत आहे. तसेच २० सेकंदाच्या या टीझरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या भागाची झलक पाहायला मिळत आहे. हॉटस्टारवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल.’आर्या ३’च्या टीझरमध्ये सुष्मिता सेन म्हणत आहे,”आखिरी सांस लेनेसे पहले वह आखिरी झटका जरूर मारेगी”.

अवश्य वाचा : खूशखबर; ‘लालपरी’ची अखेर नफ्याकडे वाटचाल

२०२० मध्ये आलेल्या ‘आर्या’ या सिनेमाच्या माध्यमातून सुष्मिताने अभिनयक्षेत्रात कमबॅक केलं होतं. तर या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्रीने ओटीटी विश्वात पदार्पण केलं होतं. या सीरिजमधील सुष्मिताच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी जगासोबत भांडताना सुष्मिता दिसून आली होती.

या सीरिजबद्दल बोलताना सुष्मिता म्हणाली,”आर्याचं माझ्या हृदयात एक वेगळं स्थान आहे. या सीरिजचा प्रत्येक भाग हा कमाल आहे. आता आर्या ३ या सीरिजमध्ये एक वेगळी आर्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या भूमिकेने मला खूप काही दिलं आहे”. राम माधवानी आणि संदीप मोदी यांनी या सीरिजचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. सुष्मितासह या सीरिजमध्ये इला अरुण, सिकंदर खेर, इंद्रनील सेनगुप्ता, विकास कुमार, गीतांजली कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘आर्या ३’ ही सीरिज ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here