Mohammed Shami:क्रिकेटपटू मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित 

क्रिकेटच्या दुनियेत भारताचे नाव रोषण केल्यामुळे मोहम्मद शमी याचा अर्जुन पुरस्कार देऊन हा सन्मान करण्यात आला. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात मोहम्मद शमी याने  दुखापत असतानाही अफलातून कामगिरी केली होती.

0
Mohammad Shami

Mohammed Shami: नगर : वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याला आज (ता.९)अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते मोहम्मद शमीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्जुन पुरस्कार मिळालेला शमी हा ५८ वा क्रिकेटपटू आहे. तब्बल दोन वर्षांनंतर एका क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. या अगोदर शिखर धवनला (Shikhar Dhawan) २०२१ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.

नक्की वाचा : अंगणवाडी सेविका-मदतनीस आंदोलनाला ‘स्वराज्य’ चा पाठिंबा

क्रिकेटच्या दुनियेत भारताचे नाव रोषण केल्यामुळे मोहम्मद शमी याचा अर्जुन पुरस्कार देऊन हा सन्मान करण्यात आला. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात मोहम्मद शमी याने  दुखापत असतानाही अफलातून कामगिरी केली होती. दरम्यान,आज राष्ट्रपती भवनात खेलरत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आले. यावेळी मोहम्मद शमीसह २६  जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन) आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन) यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

अवश्य वाचा : वेताळबाबा क्रीडांगणावर उद्याचे राष्ट्रीय खेळाडू घडतील : अण्णा हजारे

मोहम्मद शमीने भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. शमी पहिल्या ४ सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने क्रिकेट जगताला धक्काच दिला. शमीने स्पर्धेत ७ सामने खेळले, ज्यात त्याने सर्वाधिक २४ विकेट घेतल्यात. विश्वचषकात त्याने ५.२६च्या सरासरीने या विकेट घेतल्या. मात्र, भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर शमीने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘अर्जुन पुरस्कार मिळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’. ‘काही माणसे यासाठी सर्वस्व पणाला लावतात. लोकांचे आयुष्य निघून जाते पण तरीही काही व्यक्तींना हा पुरस्कार मिळत नाही. तसेच, काहींना आयुष्याच्या शेवटी मी मिळतो. मी नशीबवान आहे की मला हा पुरस्कार मिळाला.” शमी पुढे म्हणाला, “दुखापत हा खेळाचा एक भाग आहे, पुनरागमन करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो मात्र सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आहे. संघात लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. हे माझ्यासाठी आणि या संघासाठी अधिक महत्वाचे आहे, असं त्याने यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here