Accident : रस्त्याच्या कडेला उभे असलेल्यांना ट्रकने दिली धडक; एक ठार, दोन जखमी

Accident

0
Accident
Accident

Accident : श्रीगोंदा : रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) एक जण ठार (Killed) झाला तर दोन जण गंभीर जखमी (seriously injured) झाले आहेत. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे शनिवारी (दि.१३) रोजी सकाळी घडली.

नक्की वाचा : नगरच्या रेल्वे स्थानकात अतिरेकी घुसले.. पोलिसांनी पकडले; पण…

या भीषण धडकेत अभिषेक बबन मोरे (वय २२, रा.तनपुरेवाडी, ता.पाथर्डी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर केशरबाई नाना जाधव (रा. शिरसगाव काटा ता.शिरुर) व शहाजी दामोधर बरबडे (रा.राशीन, ता.कर्जत) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या बाबत महेश बुचकुल यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक वीरसिंग आनंथराम सिंग (रा.सिती, जम्मू आणि काश्मीर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा : मुंबईच्या आंदाेलनात ३ कोटींपेक्षा कमी मराठे आले, तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

काष्टी येथे शनिवारी जनावरांचा बाजार असल्याने तेथे गर्दी होती. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना नगर-दौंड रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मातोश्री ग्रामीण रुग्णालयाजवळ तिघांना जोराची धडक दिली. या भीषण धडकेत अभिषेक मोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर केशरबाई जाधव व शहाजी बरबडे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

अवश्य वाचा : मंदिर चोरी व घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here