Child Marriage  : बालविवाह मुक्त भारताच्या संकल्पासाठी निघणार सायकल यात्रा

ही यात्रा ११ दिवसांत जिल्ह्यात ४४१ किलोमीटरचा प्रवास करत जनजागृती करणार आहे. सुमारे १५० लोक या सायकल यात्रेत सहभागी झाले आहेत.

0
Child Marriage : बालविवाह मुक्त भारताच्या संकल्पासाठी निघणार सायकल यात्रा
Child Marriage : बालविवाह मुक्त भारताच्या संकल्पासाठी निघणार सायकल यात्रा

Child Marriage  : राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त ‘बालविवाह मुक्त भारत, मानवाधिकारयुक्त भारत’ हा संकल्प घेऊन संकल्प घेऊन १६ ते २६ जानेवारी या कालावधीत बालविवाह (Child Marriage) विरोधात जागृती सायकल यात्रा (Bicycle Rally) काढण्यात येणार आहे. स्नेहालय व युवानिर्माण व उडान प्रकल्पाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ही यात्रा ११ दिवसांत जिल्ह्यात ४४१ किलोमीटरचा प्रवास करत जनजागृती करणार आहे. सुमारे १५० लोक या सायकल यात्रेत सहभागी झाले आहेत.

बालविवाह देशासमोरील चिंता (Child Marriage)

बालविवाह ही मागील काही शतकांपासून चालत आलेली भारतातील एक प्रमुख समस्या आहे. मात्र, आजही बालविवाहाचे प्रमाण भारतात ४७ टक्के तर महाराष्ट्रात ३५ टक्के आहे. लोकसंख्यावाढीशी थेट संबंध असणाऱ्या बालविवाहांमुळे मातामृत्यू, गर्भपात, कुपोषित अर्भके (राष्ट्रीय प्रमाण ४२ टक्के) याचबरोबर स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरणासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत. महिला अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये बालविवाह झालेल्या मुलींचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे सामाजात जागृती व्हावी, या उद्देशाने ही सायकल यात्रा काढण्यात आली आहे.

सायकल यात्रेचा प्रवास (Child Marriage)

या उपक्रमात स्नेहालय, युवा निर्माण प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, उडान बालविवाह मुक्ती मिशन, अनाम प्रेम, उचल फाउंडेशन, स्नेहप्रेम, राजमुद्रा अॅकॅडमी, युवा निर्माण, महिला व बालकल्याण विभाग, न्यायाधिकार संस्था, आय लव्ह नगर फाउंडेशन, रोटरी क्लब इंटरनॅशनल या संस्था सहभागी झाल्या आहेत. ही यात्रा सोमवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजता स्नेहालय एम.आय.डी.सी. येथून निघेल. पाथर्डी- शेवगाव- नेवासा- श्रीरामपूर- कोपरगाव – राहाता – शिर्डी – अकोले – संगमनेर – गुहा – राहुरी – सोनई – शनिशिंगणापूर मार्गे ही यात्रा पुन्हा स्नेहालयाच्या एम.आय.डी.सी.तील प्रकल्पात येईल. या सायकल यात्रेत महाविद्यालयीन विद्यार्थी, पुरुष, महिला व मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

संयोजन टीम (Child Marriage)

या सायकल यात्रेच्या संयोजन समितीत प्रमुख सल्लागार नितीन थाटे, रोटरी क्लब अहमदनगरचे अध्यक्ष माधवराव देशमुख, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे दीपक गुजराती, अहमदनगर जिल्हा सायकल असोसीएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, युवा निर्माणचे मानद संचालक डॉ. विनय कोपरकर, स्नेहालयाचे संचालक हनीफ शेख, प्रमुख सल्लागार डॉ. सुधा कांकरिया, अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भाग्यश्री पाटील, उडानचे मानद संचालक अॅड. बागेश्री जरंडीकर, मुख्य सहयोग डॉ. मनीषा लढ्ढा, स्नेहालयाचे विश्वस्त डॉ. अंशू मुळे, राजमुद्रा अॅकॅडमीच्या प्रा. नंदा पांडुळे, समन्वयक विकास सुतार, प्रवीण कदम, संयोजक उषा खोल्लम, स्वाती ढवळे, दीक्षा वावरे, सीमा जुनी यांचा संयोजन टीममध्ये समावेश आहे.

बालविवाह देशासमोरील चिंता (Child Marriage)
सायकल यात्रेचा प्रवास (Child Marriage)
बालविवाह देशासमोरील चिंता (Child Marriage)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here