Korthan Khandoba: कोरठण खंडोबा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0
Korthan Khandooba
Korthan Khandooba

Korthan Khandoba: पारनेर : प्रतिजेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पिंपळगाव रोठा (Pimpalgaon Rotha) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा येथे वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम नाम (Akhand Harinam Saptah) सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री (Tukaram Maharaj Shastri) यांच्या प्रेरणेने व डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानच्या अध्यक्ष शालिनी घुले यांच्यासह उपाध्यक्ष महेश शिरो, विश्वस्त राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. 

नक्की वाचा : बालविवाह मुक्त भारताच्या संकल्पासाठी निघणार सायकल यात्रा

अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन (Korthan Khandoba)

 या अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान पहाटे ४ ते ६ काकडा भजन ५ ते ६ वाजता हरिपाठ ७ ते ९ वाजता हरिकिर्तन होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तने या सप्ताहांमध्ये होणार आहे. यामध्ये १७ जानेवारी रोजी बीड येथील संतोष महाराज वनवे, १८ जानेवारी रोजी धारूर येथील प्रकाश महाराज साठे, १९ जानेवारी रोजी भिगवण येथील विकास महाराज देवडे, २० जानेवारी रोजी गेवराई येथील अक्रूर महाराज साखरे, २१ जानेवारी रोजी आष्टी येथील सुनील महाराज झांबरे, २२ जानेवारी रोजी पैठण येथील शिवानंद जी महाराज शास्त्री, २३ जानेवारी रोजी हिंगोली येथील सोपान महाराज सानप यांचं कीर्तन होणार आहे. 

अवश्य वाचा : आदर्श शिंदेच्या आवाजातलं ‘प्रभू श्रीराम’ गाणं प्रदर्शित

बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता (Korthan Khandoba)

२४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता परभणी येथील बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याचे कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल. त्यामुळे या धार्मिक कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पांडुरंग गायकवाड सचिव जालिंदर खोसे, खजिनदार तुकाराम जगताप, चिटणीस कमलेश घुले, अशोक घुले, विश्वस्त राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे, सुवर्णा घाडगे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, महादेव पुंडे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले यांनी देवस्थानच्या वतीने केले आहे.

अवश्य वाचा : मराठा आरक्षणावर अजय महाराज बारस्करांनी सांगितला तोडगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here