Ahmednagar Mahakarandak : अहमदनगर महाकरंडकचे रविवारी बक्षीस वितरण, खास फिल्म बघायला मिळणार

Ahmednagar Mahakarandak

0
Ahmednagar Mahakarandak
Ahmednagar Mahakarandak

Ahmednagar Mahakarandak : नगर : अहमदनगर महाकरंडकच्या (Ahmednagar Mahakarandak) अंतिम फेरीच्या स्पर्धेत राज्यातून आलेल्या पंचवीस एकांकिका सादर झाल्यात. आता उत्सुकता लागली आहे ती स्पर्धेतील विजेत्यांची. या स्पर्धेचे रविवारी (ता. 21) सकाळी अकरा वाजता बक्षीस वितरण होणार आहे. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे (Shantikumarji Firodia Memorial Foundation) अध्यक्ष व अहमदनगर महाकरंडकचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia), आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), श्री महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी, झी मराठीचे चिफ चॅनेल ऑफिसर भावेश जानवलेकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे अहमदनगर विभागप्रमुख शशांक साहू, स्वप्नील मुनोत यांच्याबरोबर या स्पर्धेला लाभलेले परीक्षक अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक संजय मोने, अभिनेते अतुल परचुरे, अभिनेत्री कृतिका तुळसकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा होत आहे.

हे देखील वाचा : भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना; मनाेज जरांगे पाटलांची उद्या नगरमध्ये दीडशे एकरावर सभा

यंदा स्पर्धेचे 11 वे वर्ष (Ahmednagar Mahakarandak)

अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगर हे स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदा या स्पर्धेचे 11 वे वर्ष होते. तर 18 ते 21 जानेवारीला अहमदनगरमधील माऊली सभागृहात ही स्पर्धा पार पाडली.

नक्की वाचा : साडेबारा एकर भूखंड प्रकरणात ‘त्या’ १०० ते १५० कुटुंबांना तूर्तास दिलासा

दर्जेदार एकांकिकेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन (Ahmednagar Mahakarandak)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दर्जेदार एकांकिकेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर लेट्सअप तर असोसिएशन विथ आय लव्ह नगर आहे. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत आपली भूमिका बजाविली आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र स्पर्धेचे बँकिंग पार्टनर होते.

Ahmednagar Mahakarandak

राज्यभरातील विविध नाट्य संस्थांच्या 25 एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्या. या सर्व एकांकिकांचे सादरीकरण 18 ते 20 जानेवारी या कालावधीत झाल्या. माऊली सभागृहाच्या रंगमंचावर सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत एकांकिका पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळाली होती.  

नॅशनल अवॉर्ड विजेत्या फिल्म बघा
बक्षीस वितरणानंतर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत उत्सवमूर्ती, कालसर्प आणि कुंकुमार्चन या नॅशनल अवॉर्ड विजेत्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग विशेष निमंत्रितांसाठी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here