Ahmednagar Mahakarandak : कलाकारांची मांदियाळी; उद्यापासून नगरमध्ये अहमदनगर महाकरंडक

Ahmednagar Mahakarandak : नगर : कलाकारांना घडविणाऱ्या राज्यातील सर्वात मोठ्या अहमदनगर महाकरंडकच्या (Ahmednagar Mahakarandak) अंतिम फेरीच्या स्पर्धेला येत्या गुरुवारी (ता. १८) पासून नगरमध्ये सुरुवात होत आहे.

0
Ahmednagar Mahakarandak
Ahmednagar Mahakarandak

Ahmednagar Mahakarandak : नगर : कलाकारांना घडविणाऱ्या राज्यातील सर्वात मोठ्या अहमदनगर महाकरंडकच्या (Ahmednagar Mahakarandak) अंतिम फेरीच्या स्पर्धेला येत्या गुरुवारी (ता. १८) पासून नगरमध्ये सुरुवात होत आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स (Entertainments) आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगर हे स्पर्धेचे आयोजक आहे. यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. तर १८ ते २१ जानेवारीला अहमदनगरमधील माऊली सभागृहात ही स्पर्धा होणार असल्याची माहिती शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष व अहमदनगर महाकरंडकचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) व श्री महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी यांनी दिली.

नक्की वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे

Ahmednagar Mahakarandak
Ahmednagar Mahakarandak

दर्जेदार एकांकिका (Ahmednagar Mahakarandak)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दर्जेदार एकांकिका या स्पर्धेत सादर होत असतात. आत्तापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून एका पेक्षा एक सरस कलाकार घडले आहेत. त्यांनी नाटक, टीव्ही आणि सिनेजगतामध्ये आपला ठसा उमटवला आहे. या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर लेट्सअप तर असोसिएशन विथ ‘आय लव्ह नगर’ आहे. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत आपली भूमिका बजाविणार आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र स्पर्धेची बँकिंग पार्टनर आहे. ‘मेळा रंगकर्मींचा उत्सव रंगभूमीचा’ अशी टॅगलाईन घेऊन अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा दणक्यात साजरी होते. हौशी रंगभूमीपासून ते व्यावसायिक रंगभूमीला नव्या दमाचे कलाकार देण्यात अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेचा सिंहाचा वाटा आहे.

हे देखील वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त

राज्यभरातील संघांचा सहभाग (Ahmednagar Mahakarandak)

अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा २०२४ या स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि अहमदनगर येथे नुकतीच पार पडली आहे. या फेरीतून राज्यभरातील विविध नाट्य संस्थांच्या २५ एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. या सर्व एकांकिकांचे सादरीकरण १८ ते २० जानेवारी या कालावधीत होणार आहे. माऊली सभागृहाच्या रंगमंचावर सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत एकांकिका पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.

अवश्य वाचा : जिल्ह्यात १७ पोलीस निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

यंदा खास परीक्षक : यंदा या स्पर्धेसाठी नेहमीप्रमाणे खास परीक्षक लाभले आहेत. परिक्षक म्हणून अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक संजय मोने, अभिनेते अतुल परचुरे आणि अभिनेत्री कृतिका तुळसकर हे काम पाहणार आहेत.

रविवारी बक्षीस वितरण आणि नॅशनल अवॉर्ड विजेत्या फिल्म बघा!
रविवारी (ता. २१) दुपारी १२ ते २ बक्षीस वितरण समारंभ होईल. तर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उत्सवमूर्ती, कालसर्प आणि कुंकुमार्चन या नॅशनल अवॉर्ड विजेत्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग विशेष निमंत्रितांसाठी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here