Hind Seva Mandal : हिंद सेवा मंडळाची जागा विकण्याचा घाट; निर्णयाला कडाडून विराेध करण्याचा लाेढा यांचा इशारा

Hind Seva Mandal : नगर : हिंद सेवा मंडळ (Hind Seva Mandal) या शैक्षणिक संस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी सावेडी येथील संस्थेकडे लीजने असलेली मोठी जागा अरुण जगताप व राजेश भंडारी यांना देण्याचा घाट घातला आहे.

0
Hind Seva Mandal
Hind Seva Mandal

Hind Seva Mandal : नगर : हिंद सेवा मंडळ (Hind Seva Mandal) या शैक्षणिक संस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी सावेडी येथील संस्थेकडे लीजने असलेली मोठी जागा अरुण जगताप व राजेश भंडारी यांना देण्याचा घाट घातला आहे. हा व्यवहार बेकायदेशीर असून संस्थेचे नुकसान करणारा आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय दबावतंत्रामुळे (Political pressure) हा चुकीचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयास संस्थेचे आजीव सभासदांचा तीव्र विरोध आहे. येत्या २१ जानेवारी रोजी होणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) या निर्णयाला कडाडून विरोध करणार आहोत, असा इशारा हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष वसंत लोढा यांनी दिला.

हे देखील वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा (Hind Seva Mandal)

हिंद सेवा मंडळाच्या या निर्णयास विरोध करण्यासाठी संस्थेचे माजी कार्याध्यक्ष वसंत लोढा, आजीव सभासद दीप चव्हाण, बंडू विप्रदास, अनिल गट्टानी, मंदार मुळे, संजय घुले, जयकुमार बोगावत, अजय गुगळे, प्रकाश सोहनी आदींनी संस्थेच्या कार्यलयात जाऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.अनंत फडणीस, माजी कार्यध्यक्ष अजित बोरा, संचालक सुमतिलाल कोठारी आदींनी त्यांच्याशी चर्चा केली.

नक्की वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे

कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यास असमर्थ (Hind Seva Mandal)

दीप चव्हाण म्हणाले, ”हिंद सेवा मंडळाची चार एकरहून अधिक मोठी जागा विकण्यात येणार आहे, अशी माहिती आम्हला कळताच आम्ही आजीव सभासदांनी तातडीने बैठक घेऊन या निर्णयास विरोध करण्यासाठी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी हिंद सेवा मंडळाच्या कार्यलयात धाव घेतली. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अरुण जगताप व राजेश भंडारी यांनी दिलेल्या साध्या पत्रावर संस्थेने एवढी मोठी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात हिंद सेवा मंडळाचा या जागेवर अजून ४४ वर्ष करारानुसार हक्क आहे. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांना अंधारात ठेवून हा निर्णय घेत आहेत. प्रत्यक्षात संस्थेचे पदाधिकारी अद्याप कोणतेही कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे या निर्णयास आम्ही विरोध करत आहोत.

अवश्य वाचा : जिल्ह्यात १७ पोलीस निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here