Municipal council : ”नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा” आमदार कानडे यांच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना

Municipal council : श्रीरामपूर : नगरपरिषद हद्दीत असलेला नेवासा-संगमनेर रस्ता तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांनी मुख्याधिकारी (Principal) गणेश शिंदे यांना केली.

0
Lahu Kanade
Lahu Kanade

Lahu Kanade : श्रीरामपूर : नगरपरिषद (Municipal council) हद्दीत असलेला नेवासा-संगमनेर रस्ता तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांनी मुख्याधिकारी (Principal) गणेश शिंदे यांना केली. श्रीरामपूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) च्यावतीने आमदार कानडे यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निवेदन देण्यात आले होते.

सतत लहान-मोठे अपघात (Municipal council)

हे देखील वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त


या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहराला जोडणारे बेलापूर-श्रीरामपूर, नेवासा- श्रीरामपूर, खंडाळा-श्रीरामपूर, गोंधवणी-श्रीरामपूर या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु श्रीरामपूर शहर नगरपालिका हद्दीतील नेवासा नाका ते संगमनेर नाका हा रस्ता अतिशय महत्त्वाचा व जास्त रहदारी असलेला रस्ता आहे. या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर एस. टी. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, भाजी मार्केट, पोलीस स्टेशन, पेट्रोल पंप, व्हीआयपी गेस्ट हाऊस यांच्यासह विविध शासकीय कार्यालये, बाजारपेठ, छोटी-मोठी व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्याचबरोबर शहरातील व परिसरातील तालुक्यामधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. नेवासा नाका ते संगमनेर नाका या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे सतत लहान-मोठे अपघात घडतात. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे चार चाकी व दुचाकी वाहनांसह सर्वांनाच या रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने याकामी आपण लक्ष घालावे, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली.

तातडीने दुरुस्त करण्याची सूचना (Municipal council)

नक्की वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे


यावर आमदार कानडे यांनी मुख्याधिकारी शिंदे यांचेशी तत्काळ संपर्क साधत याविषयीची सविस्तर माहिती घेतली. तसेच रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची सूचना केली. तसे लेखी पत्र मुख्याधिकारी यांना दिले. निवेदन देतेवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक थोरे, भगवान उपाध्ये, सुधीर वायखींडे, लक्ष्मण कुमावत, सिद्धांत छल्लारे, तेजस बोरावके, संजय साळवे, प्रमोद गायकवाड, प्रकाश परदेशी, राजेंद्र बोरसे, बापू बुधेकर, रोहित नाईक, विवेक घुले, उमेश छल्लारे, पवन सूर्यवंशी, शिवा पानसरे, जय औताडे, गोपाल अहिरराव, शरद गवारे, देवेंद्र पिडीयार,लोकेश नगरे, मोती व्यवहारे, सुहास परदेशी, विशाल पापडीवाल, सुरेश थोरे, विशाल दुपाटी, संतोष भांबारे, बापू कदम, गोरख गुळवे, संतोष उदावंत, गणेश मुथा, डॉ. प्रशांत खैरनार, रवी सोनावणे, दत्तू करडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

अवश्य वाचा : जिल्ह्यात १७ पोलीस निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here