Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच – शरद पवार

Ajit Pawar becoming Chief Minister is a dream - Sharad Pawar

0
251

नगर : अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार वार केला आहे. शरद पवार आज (ता.१२) अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत विविध विषयांवर भाष्य केलं.

जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवार म्हणाले, “हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही”.

शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत भाष्य केलं. “प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी काय झालं याचा विचार न करता पुढचा विचार करावा. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीला असतील की नाही ते आघाडी आणि प्रकाश आंबेडकर ठरवतील. आमचा आग्रह हाच असणार आहे की जे तीन पक्ष एकत्र आलो आहोत त्यांचंच सरकार येईल. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार”, असं शरद पवार म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here