Anna Hazare : आमदार जितेंद्र आव्हाडांना ‘ते’ ट्विट महागात पडणार; अण्णा हजारे अब्रुनुकसानीचा दावा ठाेकणार

Senior social reformer Anna Hazare tweeted, "This man has made the country crazy. MLA Jitendra Awad's sarcastic tweet that wearing a hat means no one is Gandhi, Hazares have become very aggressive against Awad.

0
250

नगर : ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे (Anna Hazare) यांचा फाेटाे ट्विट करत ”या माणसाने देशाचे वाटाेळे केले. टाेपी घातली म्हणजे कुणी गांधी हाेत नाही,” असं खाेचक ट्विट (Tweet) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्याने हजारे हे आव्हाड यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. या ट्विटला आता अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारे म्हणाले, ”माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी जेवढे काही कायदे केले, त्या कायद्यांचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं, माझ्या काही आंदोलनांमुळे त्यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. आम्ही वकिलाचा सल्ला घेऊन जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here