Balasaheb Thorat : केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे विरोधकांचा आवाज दाबला जातोय : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

0
Balasaheb Thorat

Balasaheb Thorat : राहुरी : देशात लोकशाहीच्या (Democracy) नावाखाली जो कारभार सुरू आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची ताकद मतदारांच्या हातात आहे. पक्षच पळविले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. आगामी काळात जनतेने सत्ताधार्‍यांना वठणीवर न आणल्यास देशाचे मोठे नुकसान होईल. भविष्यात निवडणूका (Elections) होतील याची खात्री नाही. जनतेने आता महाविकास आघाडीलाच बळ देण्याचे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले.

हे देखील वाचा: ‘लाेकसभे’ला लाेकांची पसंती कुणाला; सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समाेर

निळवंडेचे पाणी आले प्रथमच (Balasaheb Thorat)


राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी प्रथमच आले. आमदार थोरात यांसह आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लाभार्थी गावांना भेट दिली. दोन्ही नेत्यांवर जेसीबीने पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. कानडगाव ग्रामस्थांसह सोनगाव, सात्रळ, तांदुळनेर, गणेगाव, चिंचविहीरे, वडनेर, कनगर, तांभेरे, निंभेरे आदी ग्रामस्थांकडून सन्मान आयोजित करण्यात आला होता. सभेच्या अध्यक्षस्थानी कानडगावचे पाटीलबा गागरे होते.

नक्की वाचा: अबब! ईव्हीएम गेलं चोरी; निवडणूक आयोगाने तहसीलदारांसह ‘या’ अधिकाऱ्यांना केले निलंबित

कालवा निर्मितीला अनंत अडचणी (Balasaheb Thorat)


 आमदार थोरात म्हणाले, निळवंडे धरण बांधतानाच अनंत अडचणी आणण्याचे काम झाले. धरणानंतर कालव्याला मान्यता मिळाली. परंतू कालवा निर्मितीला अनंत अडचणींचा आल्या. निळवंडे कालव्यासाठी पाठपुरावा केल्याचे आज समाधान आहे. पाण्याचे समान वाटप व्हावे, हे धोरण आत्मसात करण्यासाठी मध्य प्रदेशमधील मोहनपुरा प्रकल्प जसा आहे तसा आपल्या भागात राबविला पाहिजे. तरच पाण्याचे समान वाटप करता येईल. कोणत्याही परिसरात दुष्काळी-जिरायती असे दोन भाग न राहता सधन परिसर निर्मितीसाठी हा प्रकल्प महत्वाचा राहणार आहे.


आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, निळवंडे कालव्यासाठी सर्वाधिक पाठपुरावा आमदार थोरात यांनीच केला. तीन पिढ्यांच्या संघर्षानंतर निळवंडेचे पाणी राहुरी परिसराला मिळाले. महाविकास आघाडीच्या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री आमदार थोरात यांसह माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मोलाचे योगदान दिले. यांनी बाराशे कोटी रुपयांची तरतूद केली .म्हणूनच आजचा सोन्याचा दिवस दिसत आहे. याप्रसंगी मधुकर महाराज घोरपडे, कालवा कृती समितीचे गंगाधर गमे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सोपानराव हिरगळ यांनी प्रास्ताविक केले. सुदामराव संसारे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here