Balasaheb Thorat : गृहमंत्रीच नव्हे तर राज्य सरकार अपयशी – बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

0
Balasaheb Thorat


Balasaheb Thorat : नगर : गृहमंत्रीच नव्हे तर राज्य सरकार (State Govt) अपयशी ठरले आहे. ते तीन लोक झाले आहेत. एक मुख्यमंत्री, दुसरे माजी मुख्यमंत्री. त्यांना मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याची इच्छा आहे. तिसरे उपमुख्यमंत्री. त्यांच्यात एवढी सत्ता स्पर्धा सुरू आहे की, त्यांना जनतेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांना अपयश येत आहे. सत्ता मिळविण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत. जनतेसाठी अथवा महाराष्ट्र (Maharashtra) पुढे जावा यासाठी ते गेलेले नाहीत. सत्ता स्पर्धेचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहेत. त्यामुळे राज्य सरकार अपयशी ठरत आहे, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना लगावला.

नक्की वाचा: एकनाथ शिंदे सरकारी पैशाने गुंडांना पोसतात : संजय राऊत

काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची बैठक (Balasaheb Thorat)


नगर शहरातील शासकीय विश्रामगृहावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा: माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह व डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

नेतेमंडळींनी पक्ष सोडला तरी जनता मात्र सोबत (Balasaheb Thorat)


काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षावर कठीण काळ आहे हे मी मान्य करतो. मात्र, एक काळ काँग्रेस कुठे आहे अशी स्थिती होती. १९९९, २००९ ला काँग्रेसचे किती लोक निवडून येणार असा प्रश्न विचारला जात होता. तरीही काँग्रेस उभी राहिलेली आपण पाहिली आहे. नेते मंडळींचे काही हेतू असतील, अथवा अडचणी असतील. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला. जनता मात्र, आपल्या बरोबर आहे. जनता काँग्रेस बरोबर राहील त्याचा परिणाम लोकांना दिसून येईल. पदाधिकारी म्हणजे काँग्रेस नव्हे तर जनतेत असलेला काँग्रेसचा विचार व त्यावरील विश्वास म्हणजे काँग्रेस आहे, असे त्यांनी सांगितले.


बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, निळवंडे पाणी वाटपा बाबतचा प्रस्तावही मी राज्य सरकारला दिला आहे. निळवंडे पाट योजनेचा योग्य उपयोग केल्यास देशाला आदर्श ठरेल असा प्रकल्प तयार होईल. पूनर्वसन प्रकल्प पूर्ण करून तयार केलेला हा प्रकल्प आहे. आमच सरकार निश्चित राज्यात येईल. त्यानंतर आम्ही हा प्रकल्प चांगल्या प्रकारे पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here