lawyer : वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केले आक्रमक आंदोलन

lawyer : वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केले आक्रमक आंदोलन

0
lawyer

lawyer : नगर : वकिलांवर होणारे हल्ले थांबबेत, राहुरी येथील वकील (lawyer) दाम्पत्याची हत्या (Murder) करणाऱ्या आरोपींना मोक्का लावावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी या मागण्यांसाठी आज सकाळी शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघटनच्या वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने वकील सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वकील आक्रमक झाले होते.

नक्की वाचा: एकनाथ शिंदे सरकारी पैशाने गुंडांना पोसतात : संजय राऊत

वकिलांची जोरदार घोषणाबाजी (lawyer)


आज सकाळी ११ वाजता नगर जिल्हा न्यायलयापासून पायी निघालेल्या या मोर्च्यात सहभागी झालेल्या वकिलांनी ‘एक वकील लाख वकील’, ‘अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू झालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या. यावेळी शहर वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे यांच्या सह सर्व तालुक्यांच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप हे पायी या मोर्च्यात सहभागी झाले होते. महिला वकिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्व मोर्चेकरी वकिलांनी विविध मागण्यांचे पोस्टर्स हातात घेतले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

हे देखील वाचा: गृहमंत्रीच नव्हे तर राज्य सरकार अपयशी – बाळासाहेब थोरात

महामोर्चा गेटवरच अडवल्याने वकिलांकडून संताप व्यक्त (lawyer)


जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा गेटवरच अडवण्यात आला. यावेळी वकिलांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शहर वकील संघटनेचे सचिव संदीप शेळके, उपाध्यक्ष महेश शेडाळे, महिला सहसचिव भक्ती शिरसाठ, खजिनदार शिवाजी शिरसाठ, सहसचिव संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अमोल अकोलकर, सारस क्षेत्रे, विनोद रणसिंग, देवदत्त शहाणे, शिवाजी शिंदे, रामेश्वर कराळे, अस्मिता उदावंत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी वकिलांच्या मागण्या व भावना शासनापर्यंत पोहोचवतो असे आश्वसन दिले.

lawyer


बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेर तालुका बार असोसिएशनचा सदस्य व आमदार म्हणून मी  या महामोर्च्यास पाठिंबा देत आहे. राहुरीच्या घटनेने सर्व वकिलांमध्ये दहशतीचे वातवरण निर्माण झाले आहे. पुढील काळात वकिलांनी गुन्हेगारांचे वकीलपत्र घ्येयचे कि नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. वकिलांना निर्भीडपणे काम करण्यासाठी राज्य शासनाने वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी मागणी केली.

                                                                       
आमदार संग्राम जगताप म्हणाले, वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांनी मोठा मोर्चा काढून आवाज उठवला आहे. या आंदोलनाला नुसता पाठींबा न देता वकील संरक्षण कायदा लागू व्हावा यासाठी येत्या अधिवेशनात पाठपुरावा करून आवाज उठवणार आहे, असे त्यांनी सांगितले.


 यावेळी जळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष रामकांत पाटील, श्रीगोंदा बार असोसिएशनचे अध्यक्ष मोटे, पाथर्डी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर, नेवासा  बार असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण पिसाळ, श्रीरामपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.एन. पाटील, कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष कैलास शेवाळे, शेवगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष रामदास बुधवंत आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here