Bhandardara : भंडारदरा परिसर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज

Bhandardara : भंडारदरा परिसर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज

0
Bhandardara : भंडारदरा परिसर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज
Bhandardara : भंडारदरा परिसर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज

Bhandardara : अकोले : निसर्ग पंढरी म्हणून आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झालेल्या भंडारदरा पर्यटन (Tourism) क्षेत्रामध्ये नववर्षाच्या (new year) स्वागतासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. भंडारदरा (Bhandardara) धरणाचा जलाशय व माळरानावर विद्युत रोषणाईसह विविध रंगीबेरंगी कापडी तंबूंची कमान उभी राहिली आहे.

हे देखील वाचा: ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला नगरचा सराफ व्यावसायिक; महिलेकडून चक्क दहा लाखाची मागणी


अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा धरण हे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील वर्षाऋतू म्हणजे निसर्गाचा खास अविष्कार पर्यटकांसाठी अविस्मरणीय असतो. भंडारदरा पर्यटनात खासकरून डिसेंबरमध्ये सुट्टीचे औचित्य साधत नाताळासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचे जथ्थे दाखल होऊ लागले आहेत. या पर्यटकांच्या स्वागतासाठी भंडारदर्‍यातील टेंटधारक, हॉटेल व्यावसायिक निरनिराळे फंडे वापरत पर्यटकांना आकर्षित करत आहेत. जलाशयाच्या कडेला टेंट उभारले जात असून इच्छुक टेंटमध्ये राहण्यास पसंती देत असले तरी अनेक पर्यटक हॉटेल्समध्ये मुक्कामी राहून भंडारदर्‍याच्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

नक्की वाचा : महापालिकामध्ये प्रशासक राज सुरू; प्रशासकपदी आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांची नियुक्ती

अनेक टेंटधारक व हॉटेलधारकांनी पर्यटकांना नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष सवलती दिलेल्या आहेत. अनेक हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शनिवार व रविवारची सुट्टी घेऊन पर्यटक महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी पसंती देत आहे. अलंग-कुलंग-मलंग या गडकिल्ल्यांवरही साहसी पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात हजर होत आहेत. पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण, अमृतेश्वर मंदिर, धरणातील बोटिंगही पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.


कळसूबाई शिखरावर नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान करू नये, तसेच कचरा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे व वन्यजीव विभागाचे अमोल आडे यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here