Narendra Modi:’रामलल्लाच नाही, तर देशातील चार कोटी जनतेला मिळाले घर’: नरेंद्र मोदी 

Narendra Modi: 'एक काळ असा होता की रामलल्ला तंबूत होते. आता फक्त रामलल्लाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरुपी घर मिळाले आहे. आमच्या सभ्यतेने आम्हाला मार्ग दाखवला,असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

0
Narendra Modi

नगर : ‘एक काळ असा होता की रामलल्ला (Ramlalla) तंबूत होते. आता फक्त रामलल्लाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरुपी घर (A permanant home) मिळाले आहे. आमच्या सभ्यतेने आम्हाला मार्ग दाखवला,असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.३०) अयोध्येचा दौरा (Ayodhya Tour) केला. यावेळी त्यांनी अयोध्येतील रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला (Amrut Bharat Train) हिरवा झेंडा दाखवला. या लोकार्पणाच्या सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित देखील केले. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

नक्की वाचा : सरकारचे धाेरण शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडणारे : डाॅ. अजित नवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज देशात केवळ केदारधामचे पुनरुज्जीवन झाले नाहीतर ३१५ हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालयेही बांधली गेली आहेत. आज देशात केवळ महालोकाचीच निर्मिती झाली नाही, तर प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी २ लाखांहून अधिक पाण्याच्या टाक्याही बांधल्यात.

अवश्य वाचा : संकल्प रथ यात्रेचे श्रीगोंद्यात स्वागत

अयोध्येच्या विमानतळाचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,“अयोध्या धाम विमानतळाचे नामकरण त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने केल्याने या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आशीर्वाद मिळेल. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे ज्ञानाचा मार्ग आहे, जो आपल्याला भगवान श्री रामाशी जोडतो. आधुनिक भारतात, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ,अयोध्या धाम,आपल्याला दिव्य-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here