Congress : नगर : काँग्रेसेच नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सुरु होणार आहे. १४ जानेवारीपासून मणिपूरमधून (Manipur) या यात्रेला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज (ता. ६) भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो जारी (Logo Release) करण्यात आला आहे. भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक, असा नारा या लोगोद्वारे देण्यात आलाय. या लोगोचे दोन भाग करण्यात आले आहेत. एका बाजूला भारत जोडो न्याय यात्रा हे तिरंग्याच्या रंगात लिहलं आहे. तर दुसऱ्या बाजूला न्याय का हक मिलने तक हा नारा निळ्या रंगात आहे.
नक्की वाचा : छापेमारी मागे थेट दिल्ली कनेक्शन : रोहित पवार
याबाबदल बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, १४ जानेवारीपासून ही यात्रा सुरु होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही १४ जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरु करणार आहोत. देशाच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय आणि मूलभूत प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या विषयी माहिती दिली.
अवश्य वाचा : नागा चैतन्य -साई पल्लवीच्या’थंडेल’चा टिझर प्रदर्शित
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा हा प्रवास मणिपूरची राजधानी इंफाळ पासून सुरू होईल. या पदयात्रेचा एकूण मार्ग ६७०० किलोमीटरचा असून ६६ दिवसांचा हा प्रवास असेल आणि राहुल गांधी त्यांना दिवसातून दोनदा संबोधित करतील, असं त्यांनी यावेळी सांगितले आहे. ही यात्रा मणिपूर, इम्फाळ पासून नागालँड, आसाम आणि अरुणाचलसह देशातील १५ राज्यांमधून जाणार असून शेवटी मुंबईत पोहोचणार आहे. ११० जिल्ह्यांतून जाणारी ही यात्रा लोकसभेच्या १०० आणि विधानसभेच्या ३३७ जागांचा समावेश करेल. सुमारे ६७०० किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत या यात्रेचा शेवट होणार आहे.