Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरवात 

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता काँग्रेस भारत न्याय यात्रेला सुरुवात करणार आहे.

0
Bharat Jodo Yatra

Rahul Gandhi: नगर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता काँग्रेस दुसरी यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार,लवकरच काँग्रेस भारत न्याय यात्रेला (Congress Bharat Nyay Yatra) सुरुवात करणार आहे. काँग्रेसच्या या भारत न्याय यात्रेचा प्रवास मणिपूर ते मुंबई (Manipur to Mumbai)असा असेल. या प्रवासात काँग्रेस ६२०० किलोमीटरचं अंतर पार करण्याच्या तयारीत आहे.

नक्की वाचा : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली

‘भारत न्याय यात्रा’ १४ जानेवारीपासून सुरू होणार असून ती २० मार्चपर्यंत चालणार आहे. जनतेला आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने या यात्रेला भारत न्याय यात्रा हे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या दौऱ्याला हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, या यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी करणार की, आणखी कोणी ? याबाबत काँग्रेस पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारत जोडो यात्रा ही ७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झाली होती. या यात्रेचा हा प्रवास जवळपास ५ महिने चालला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून विविध राज्यातील काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत फिरले. या प्रवासात काँग्रेसनं सुमारे ३५०० किलोमीटरचं अंतर कापलं होतं.

अवश्य वाचा : अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण

काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार,भारत जोडो यात्रेचा मुख्य उद्देश ‘द्वेष, भीती आणि कट्टरता’ या राजकारणाशी लढा देणं हा होता. याशिवाय केंद्र सरकारकडून लोकांच्या आशा-आकांक्षांकडे होणारं दुर्लक्ष आणि राजकीय केंद्रीकरण आणि अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. भारत न्याय यात्रा ही १४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here